मराठी बातम्या  /  Entertainment  /  Kranti Redkar As A Director Movie Rainbow

क्रांती रेडकरचा नवा चित्रपट, लंडनमध्ये शुटिंगला सुरुवात

रेनबो
रेनबो (HT)
Aarti Vilas Borade • HT Marathi
Jun 22, 2022 11:06 AM IST

या चित्रपटाच्या माध्यमातून क्रांती रेडकर जवळपास ६ वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन करणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे क्रांती रेडकर. (Kranti Redkar) तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ती एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाचे नाव 'रेनबो' आहे. या चित्रपटात शरद केळकर, सोनाली कुलकर्णी, उर्मिला कोठारे आणि ऋषी सक्सेना यांच्या प्रमुख भूमिका आहते. एकंदरीत चित्रपटाची तगडी स्टारकास्ट पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळते.

ट्रेंडिंग न्यूज

'रेनबो' म्हणजे अनेक रंगांचे प्रतीक आणि त्यामुळेच या चित्रपटात देखील आपल्याला विविध रंग पाहायला मिळणार आहेत. आजच्या काळात नात्यांमध्ये येणाऱ्या विविध रंगांचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांचा मिळून हा 'रेनबो' तयार होत असल्याने हे सर्व रंग एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. नुकतेच या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण सुरु झाले असून लवकरच हा चित्रपट रंगांची उधळण घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
आणखी वाचा : 'स्त्री २'साठी पुन्हा श्रद्धा कपूरची निवड? आता उलगडणार भूतकाळातलं पान

दिग्दर्शिका क्रांती रेडकर म्हणते, " 'रेनबो' हे नावच कलरफुल आहे. या नावातच सारे रंग भरलेले आहेत. नात्यातील हाच सप्तरंगी प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने अक्षय बर्दापूरकर यांच्या 'प्लॅनेट मराठी' चा भाग होण्याची संधी मला मिळाली. इतक्या दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली असून आता चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे.''

या चित्रपटाविषयी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "क्रांती रेडकर ही अतिशय उत्तम अभिनेत्री तर आहेच याशिवाय तिचे दिग्दर्शन देखील कमाल आहे. 'रेनबो' हा असा चित्रपट आहे, जो नात्यातील काही संवेदनशील गोष्टी समोर आणणार आहे. या चित्रपटाची कथा मनाला भावणारी आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.''

विभाग