मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ, 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व लवकरच
सचिन खेडेकर
सचिन खेडेकर (HT)
20 May 2022, 3:38 AM ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
20 May 2022, 3:38 AM IST
  • सचिन खेडेकर घेऊन येत आहेत कोण होणार करोडपतीचे नवे पर्व

माहितीचा स्त्रोत म्हणून छोट्या पडद्यावरील कोण होणार करोपडती या शो पाहिला जातो. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. आता सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते. संपूर्ण महाराष्ट्रातून 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो. 'आता आलीये आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ', असं या वेळच्या पर्वाचं ब्रीदवाक्य आहे.

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत. हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीनी बोलून त्यांना मानसिक आधार देण्याचं महत्त्वाचं काम सचिन खेडेकर लीलया पार पाडतात. सचिन खेडेकर हे मनोरंजन क्षेत्रातलं खूप मोठं नाव असल्यानं ज्ञानार्जन आणि मनोरंजन या दोन्हींची ते उत्तम सांगड घालतात. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक सहभागी होत असतात. प्रत्येक स्पर्धकाचा जीवनसंघर्ष जाणून घेऊन, त्याला कार्यक्रमाची माहिती देऊन त्यांना बोलतं करून सचिन खेडेकर सूत्रसंचालकाची धुरा उत्तमरीत्या सांभाळतात. प्रेक्षकांमध्येही 'कोण होणार करोडपती', या कार्यक्रमाविषयी उत्सुकता असते.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग