बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने आपल्या सुमधून आवाजाने श्रोत्यांच्या मनावर राज्य केले आहे. तिचे प्रत्येक गाणे हे हिट होताना दिसते. त्यामुळे जगभरात श्रेया घोषाल ही लाइव्ह कॉन्सर्ट घेताना दिसते. सध्या सोशल मीडियावर श्रेया घोषालच्या एका लाइव्ह कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या मैत्रिणीला सर्वांसमोर प्रपोज करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
श्रेया घोषालच्या कोलकात्या येथील कॉन्सर्टदरम्यान एक तरुण आपल्या मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी एका गुडघ्यावर बसला होता. त्यानंतर श्रेयाने त्यांना एक गाणे समर्पित करून त्यांची रात्र एक्स्ट्रा स्पेशल बनवली. या घटनेचा फुटेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हायरल व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.
सोशल मीडियावर श्रेया घोषालच्या कॉन्सर्टचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती श्रेयाशी बोलताना दिसत आहे. ती व्यक्ती 'श्रेया, तू माझे दुसरे प्रेम आहेस' असे बोलताना दिसते. ते ऐकून श्रेया लाईव्ह कॉन्सर्टमध्ये थांबते. ती त्या तरुणाला "मग तुझे पहिले प्रेम कोण?" असा प्रश्न विचारते. कोलकात्याच्या तरुणाने आपल्या मैत्रिणीकडे बोट दाखवून तिला प्रपोज करायचे असल्याचे सांगितले.
पुढे व्हिडीओमध्ये श्रेया त्या तरुणाला त्यांचे आणि त्याच्या मैत्रिणीचे नाव विचारते. मायक्रोफोन हातात घेतलेल्या या तरूणाने स्वत:चे नाव ऋषी असल्याचे सांगितले आणि आपल्या मैत्रिणीचे नाव अंतरा असल्याचे सांगितले. त्यानंतर श्रेयाने ऋषीला मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी मंचावर आमंत्रित केले. 'जर तुला तिला प्रपोज करायचे असेल तर योग्य पद्धतीने कर. तुझ्याकडे ही खूप चांगली संधी आहे. तुम्ही जाहिरपणे करत आहात. प्रत्येकजण पाहात आहे. येथे हजारो लोक उपस्थित आहेत' असे श्रेया म्हणाली. ऋषी एका गुडघ्यावर बसून प्रेयसीला प्रपोज करत असताना तिच्या या वक्तव्यावर प्रेक्षकांचे हसू उमटले. तिने हो म्हटलं, प्रेक्षकांकडून अधिक आनंद मिळाला. त्यानंतर कॉन्सर्टदरम्यान श्रेया घोषालने 'तुझ में रब दिखता है' हे गाणे या जोडप्याला समर्पित केले.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'श्रेया तू खूप गोड आहेस' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने श्रेया घोषालने सर्वसामान्य कपलला संधी दिल्यामुळे कौतुक केले आहे.
वाचा: प्रसिद्ध अभिनेत्रीचा खासगी MMS लीक, १७ सेकंदांच्या व्हिडीओने माजली खळबळ
श्रेया घोषालने ऑल हार्ट्स टूरअंतर्गत १९ ऑक्टोबर रोजी कोलकात्यात परफॉर्म केले होते. या टूरअंतर्गत श्रेया आता चंदीगड, हैदराबाद आणि लखनौसारख्या शहरांमध्ये परफॉर्म करणार आहेत. तसेच परदेशातही ती कॉन्सर्ट करणार आहे. ती सिडनी, मेलबर्न आणि ऑकलंड या देशात परफॉर्म करणार आहे.
संबंधित बातम्या