Suraj Chavan and Ankita Prabhu Walawalkar : ‘बिग बॉस मराठी ५’ या लोकप्रिय शोमधून घराघरात पोहोचलेले सूरज चव्हाण आणि अंकिता प्रभू वालावलकर यांच्यातील बहीण-भावाचे नाते सध्या तणावाच्या छायेत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांमध्ये या विषयावर चर्चा सुरू असून, अनेकांनी त्यांच्या संबंधांतील गडबड आणि तणावावर आपले मत व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी अंकिता सूरजच्या गावी भेटायला गेली होती, परंतु या भेटीदरम्यान एक अप्रत्यक्ष तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले. या तणावामुळे सूरजने अंकिता सोबतचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीट केले आणि त्याच्या अकाउंटवरून तिला अनफॉलो केलं, ज्यामुळे अंकिताच्या चाहत्यांनी सूरजवर नाराजी व्यक्त केली.
आता अंकिता या सर्व घटनांवर मोकळेपणाने आणि स्पष्ट बोलत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ नावाच्या तिच्या चॅनेलवर अंकिताने ‘माझ्याकडून आता अपेक्षा नसाव्यात, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर’ हे शीर्षक देऊन व्हिडिओ अपलोड केला. या व्हिडिओमध्ये अंकिताने सूरजबद्दलच्या काही गोष्टी स्पष्ट केल्या आणि त्याला त्रास देणाऱ्या घटनांचा उल्लेख केला. अंकिता म्हणाली की, सूरजवर कोणी राग ठेवू नये, कारण तो त्या पद्धतीनेच वागतो जसं त्याला सांगितलं जातं.
अंकिता यावेळी शांत राहण्याचा सल्ला तिच्या टीमकडून मिळाल्याचे सांगते, पण सोशल मीडियावर तिचं ट्रोलिंग सुरूच असल्याने तिने अखेर उत्तर दिले आहे. अंकिताने स्पष्ट भाषेत म्हटलं की, तिला यावर विचार करण्यास वेळ नाही, कारण तिचं वेळापत्रक खूप व्यस्त असल्याने ती यावर जास्त लक्ष देऊ शकत नाही. तरीही तिचे चाहते तिला याबद्दल सतत विचारत असल्याने आता तिने अखेरचे उत्तर देऊन टाकले आहे..
बिग बॉसच्या शोमधून बाहेर आल्यानंतर, अनेक स्पर्धक सूरजच्या घरी भेट देण्यास गेले होते. अंकिता उशिरा गेल्यामुळे तिच्यावर टीका झाली. याबाबत ती म्हणाली, ‘प्रत्येक जण आपल्या वेळेनुसार जातो. सूरजनेच मला फोन करून विचारलं की, तू का आली नाहीस? पण त्याचे हे शब्द कुणीतरी त्याला बोलायला लावले होते,’ असे तिने म्हटले. सूरजवर काही लोक प्रेम करत असले तरी, अंकिताला असे वाटते की, सूरजच्या वागण्यामागे काही लोक त्याला वापर करत आहेत. अंकिता म्हणाली, सूरजवर प्रेम करणाऱ्यांनी त्याला आधार द्यावा, त्याचा वापर करून घेऊ नये.
अंकिता पुढे म्हणाली की, सूरजला राजकीय नेते अजित पवार घर बांधून देणार आहेत, त्यासाठी तिने पवार यांचे आभार मानले, पण त्यातल्या काही मागण्यांबद्दल तिला विचित्र वाटल्याचे तीने सांगितले. त्यावरून अंकिताने ही सर्व वादग्रस्त परिस्थिती टाळण्यासाठी शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
अंकिता जेव्हा सूरजला भेटायला गेली, तेव्हा तिने पूर्व कल्पना देऊनही सूरज तिथे नव्हता. त्यामुळे त्याच्या काही लोकांनी तिला थांबण्यास सांगितलं. सूरज आल्यानंतर थेट आत निघून गेला, त्याला अंकिताला भेटू दिलं गेलं नाही. तसंच तो घरात येत असताना अंकितासह सगळ्यांना उभं राहा, असं सांगण्यात आलं होतं. अर्थात हे सगळं विचित्र वाटत असलं, तरी ते सूरज करत नव्हता असं म्हणत अंकिताने त्याचीच बाजू घेतली.
व्हिडिओच्या शेवटी अंकिता म्हणाली की, ‘फक्त सूरजचाच फॅनबेस नाही, तर माझाही चाहतावर्ग आहे. शांत बसणं म्हणजे माझ्या चाहत्यांना उत्तर न देणं असे होईल, आणि मी ते करू शकत नाही,’ असे म्हणत तिने सूरजच्या अकाउंटवरून डिलीट झालेल्या व्हिडिओंवर भाष्य केलं. अंकिता आणि सूरज यांच्यातील हा चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. सध्याच्या परिस्थितीत हे दोघंही आपले विचार स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र या वादाचे ठोस समाधान लवकर होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.