Tony Mirchandani Passed Away: 'कोई मिल गया' आणि 'गदर' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते टोनी मिरचंदानी यांचे निधन झाले आहे. प्रदीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. काल, ४ नोव्हेंबर रोजी टोनी मिरचंदानी यांचे निधन झाल्याचे समोर आले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
टोनी मिरचंदानी यांनी साकारलेल्या सहाय्यक भूमिका नेहमीच प्रभावी ठरल्या. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. सोमवारी प्रकृती खालावल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. त्यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. टोनी मिरचंदानी नेहमीच त्यांच्या संस्मरणीय अभिनयासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनामुळे सिनेजगतात शोककळा पसरली आहे. दिवंगत अभिनेते टोनी मीरचंदानी यांच्या पश्चात पत्नी रमा मीरचंदानी आणि मुलगी श्लोका मीरचंदानी असा परिवार आहे.
टोनी मिरचंदानी यांच्या अचानक जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे. त्याच्या निधनाच्या बातमीने चाहते, त्यांचे मित्र आणि इंडस्ट्रीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. केवळ चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठीच नव्हे तर त्यांच्या ज्वलंत व्यक्तिमत्त्वासाठी आणि सकारात्मक प्रभावासाठीही ते ओळखले जायचे. त्यांच्या प्रार्थना सभेचे आयोजन केले जात आहे.
वाचा: किरण गायकवाड आणि भाग्यश्री मोटे पहिल्यांदा एकत्र, 'या' हॉरर कॉमेडी सिनेमात करणार काम
टोनी यांनी चित्रपटांसोबतच मालिकांमध्येही काम केले आहे. 'कोई मिल गया' चित्रपटामधील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते. तसेच गदर चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. चित्रपटासोबतच त्यांनी मालिकांमध्येही काम केले. या मालिकांमधील भूमिकांनी त्यांचे मन जिंकले होते.