मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Koffee With Karan 8: ‘इतक्या’ मुलींना डेट करतोय ओरी! ‘कॉफी विथ करण ८’च्या मंचावर केला मोठा खुलासा

Koffee With Karan 8: ‘इतक्या’ मुलींना डेट करतोय ओरी! ‘कॉफी विथ करण ८’च्या मंचावर केला मोठा खुलासा

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 18, 2024 08:58 AM IST

Koffee With Karan 8 Orry: सेलिब्रिटींचा लाडका ओरी म्हणजेच ओरहान अवत्रामणी करण जोहरसोबत गप्पा मारताना दिसणार आहे. यावेळी ओरी आपल्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा करणार आहे.

Koffee With Karan season 8 Orry
Koffee With Karan season 8 Orry

Koffee With Karan 8 Orry: बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याचा लोकप्रिय टॉक शो ‘कॉफी विथ करण’चा ८वा सीझन आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या आठवड्यात ‘कॉफी विथ करण’च्या ८व्या सीझनचा शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे. मात्र, यावेळी शोमध्ये काही ट्वीस्ट असणार आहेत. या भागामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी नाही तर, सोशल मीडिया कंटेंट क्रीएटर आणि काही इन्फ़्लुएसर हजेरी लावताना दिसणार आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींचा लाडका ओरी म्हणजेच ओरहान अवत्रामणी हा देखील या भागात करण जोहरसोबत गप्पा मारताना दिसणार आहे. यावेळी ओरी आपल्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा करणार आहे.

ओरी व्यतिरिक्त कुशा कपिला, दानिश सैत, तन्मय भट्ट आणि सुमुखी सुरेश यासारखे सोशल मीडिया स्टार्स देखील या शोमध्ये दिसणार आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टारने या अंतिम भागाचा प्रोमो नुकताच रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये ओरी त्यांच्या लव्ह लाईफबद्दल एक मोठा खुलासा करताना दिसला आहे. मात्र, तो खरं बोलतोय की, नाही यावर आता अनेक लोक शंका व्यक्त करत आहेत.

Aadesh Bandekar Birthday: महाराष्ट्राचे लाडके ‘भावोजी’ आदेश बांदेकर यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयत का?

‘कॉफी विथ करण ८’च्या या प्रोमोमध्ये करण जोहरने ओरीला प्रश्न केला की, तो सिंगल आहे का? यावर उत्तर देताना ओरी म्हणतो की, ‘माझ्याकडे पाच जणी आहेत.’ तेव्हा आश्चर्यचकित झालेला करण त्याला विचारतो की, ‘तू एकाचवेळी पाच लोकांना डेट करत आहेस?’ या प्रश्नाला उत्तर देताना ओरी गमतीने म्हणतो की, ‘मी चीटर आहे. मी खूप चीटिंग करतो. ओरी एक चीटर माणूस आहे.’ यावर करण जोहर देखील त्याला गंमतीने म्हणतो की, ‘तू लीवर आणि चीटर दोन्ही आहेस.’ ओरीच्या या वक्तव्यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. खरच ओरी एकाचवेळी ५ मुलींना डेट करत असेल का?, असा प्रश्न देखील नेटकऱ्यांना पडला आहे.

‘कॉफी विथ करण सीझन ८’ची सुरुवात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह या जोडीने केली होती. यानंतर सनी देओल-बॉबी देओल, सारा अली खान-अनन्या पांडे, करीना कपूर खान-आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा-वरूण धवन, काजोल-राणी मुखर्जी, विकी कौशल-कियारा अडवाणी, आदित्य रॉय कपूर-अर्जुन कपूर, अजय देवगन-आर. शेट्टी, शर्मिला टागोर-सैफ अली खान, जान्हवी कपूर-खुशी कपूर आणि झीनत अमान-नीतू कपूर यांनी देखील या शोमध्ये हजेरी लावली होती.

WhatsApp channel