Koffee With Karan 8: करण जोहरने दीपिका-रणवीरला काय गिफ्ट दिले? जाणून घ्या गिफ्ट हॅम्परविषयी-koffee with karan gift hamper list and product ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Koffee With Karan 8: करण जोहरने दीपिका-रणवीरला काय गिफ्ट दिले? जाणून घ्या गिफ्ट हॅम्परविषयी

Koffee With Karan 8: करण जोहरने दीपिका-रणवीरला काय गिफ्ट दिले? जाणून घ्या गिफ्ट हॅम्परविषयी

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 29, 2023 10:40 AM IST

Koffee With Karan Gift Hamper: निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये पाहु्ण्यांना देण्यात आलेल्या गिफ्ट हॅम्परमध्ये नेमके काय असते? चला जाणून घेऊया...

Koffee With Karan
Koffee With Karan

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा शो चर्चेत आहे. या शोचा आठवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोच्या पहिल्याच भागात अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि तिचा पती रणवीर कपूरने हजेरी लावली. या शोमध्ये त्यांनी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. हा एपिसोड विशेष चर्चेत होता. आता करण जोहरने या दोघांना गिफ्ट म्हणून काय दिले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

करण जोहरने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने कॉफी विथ करणच्या प्रत्येक भागात सहभागी होणाऱ्या कलाकारांना काय गिफ्ट देतो हे सांगितले आहे. या हॅम्परमध्ये डायमंडची ज्वेलरी, मार्शल अॅक्टन २चे स्पीकर्स, ऑडी एस्प्रेसो मोबील, अॅमेझॉन इको शो १०, वाहदम टी एंड टी मेकर सेट, न्यूहॉस चॉकलेट्स कलेक्शन डिस्कवरी बॉक्स, बॉम्बे स्वीट शॉप, खोया स्वीट, 28 बेकर स्ट्रीट, कॉफी विद करण मग आणि इतर काही गिफ्ट्स देण्यात येतात.
वाचा: कंगना रणौतचा आणखी एक सिनेमा फ्लॉप? पहिल्याच दिवशी 'तेजस'ची निराशाजनक कमाई

'कॉफी विथ करण ८'मध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. यावेळी दीपिका पदुकोण हिने स्वतःच्या आयुष्यातील एक मोठं सत्य सांगितलं आहे. रणबीर कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंह याची एंट्री झाली होती. त्यावेळी दीपिका नैराश्याचा सामना करत होती. या नैराश्यातून तिला बाहेर काढण्याचं काम रणवीरने केलं होतं. त्यावेळी रणवीर दीपिकाच्या प्रेमात पडला होता. मात्र, दीपिकाला पुन्हा रिलेशनशिपमध्ये अडकायचं नव्हतं. त्यामुळे ती या सगळ्याचा फार विचार करत नव्हती. तर, दुसरीकडे रणवीरसोबत असताना देखील आणखी काही लोकांना डेट करत होती. हा खुलासा ऐकून रणवीरही थक्क झाला होता. हे लोक कोण होते, असं विचारताच दीपिका म्हणाली की, आता तिला त्यांची नावं आठवत नाहीत.

यावेळी रणवीर काहीसा नाराज झालेला दिसला. रणवीर सिंह नेहमीच आपल्या पत्नीची बाजू घेताना दिसला आहे. तो नेहमीच दीपिकाचं कौतुक करताना दिसला आहे. मात्र, आता दीपिकाचं बोलणं ऐकून त्यालाही धक्का बसला आहे.

विभाग