बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरु आहे. अथिया शेट्टी-केएल राहुल, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी अशा काही जोड्या लग्नबंधनात अडकल्या. अशात बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय जोडी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाबाबतही चाहत्यांना अनेक प्रश्न आहेत. आता स्वत: अर्जुनने यावर प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
कॉफी विथ करण हा शो कायमच कलाकारांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. या शोमध्ये हजेरी लावणारे कलाकार हे कायमच त्यांच्या आयुष्यातील खुलासे करताना दिसतात. कॉफी विथ करणच्या आठव्या सिझनमध्ये आता अर्जुन कपूर हजेरी लावणार आहे. या शोमध्ये करण जोहरने अर्जुनला मलायकासोबतच्या नात्यावर प्रश्न विचारला आहे. त्यावर अर्जुन हे अनफेअर आहे असे मजेशीर अंदाजात म्हणतो.
वाचा: पतीनेच माझ्यासोबत सेक्स सीन देण्यासाठी अभिनेत्याला प्रोत्साहन दिले; अमृता सुभाषचा धक्कादायक खुलासा
करण जोहरने अर्जुनला विचारले की मलायकासोबतचे तुझे नाते पुढे घेऊन जाण्याचा (लग्न करण्याचा) काही विचार करतो आहेस का? यावर उत्तर देत अर्जुन म्हणाला,"आयुष्याच्या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलण्याचा हा योग्य मंच नाही. निर्णय होईल तेव्हा आम्ही दोघेही यासंदर्भात तुम्हाला माहिती देऊ. सध्या मी खूप आनंदात आहे. आमच्या नात्याबद्दल मी एकटे काही बोलू शकत नाही. मला वाटते रिलेशनबद्दल एकट्याने भाष्य करणे हे त्या नात्यासाठी चुकीचे आहे."
अर्जुन कपूरपेक्षा मलायका अरोरा नऊ वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे त्याला अनेकदा ट्रोल केले जाते. याविषयी बोलताना तो म्हणाला,"ट्रोलिंगचा फरक पडत नाही असा कोणताही व्यक्ती या जगात नाही. तुम्हाला या गोष्टींचा सामना करावाच लागतो. ट्रोल करणाऱ्यांना आधी मी उत्तर देत होतो. पण नंतर मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला लागलो."
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचा ब्रेकअप झाल्याचे काही दिवसांपूर्वी म्हटले जात होते. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात होते. पण मलायकाच्या वाढदिवशी त्यांचा रोमँटिक फोटो पाहून या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागला.
संबंधित बातम्या