Aditya Roy Kapur: 'आशिकी ३'मध्ये आदित्यऐवजी कार्तिक आर्यनची वर्णी! प्रतिक्रिया देताना अभिनेता म्हणतो...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aditya Roy Kapur: 'आशिकी ३'मध्ये आदित्यऐवजी कार्तिक आर्यनची वर्णी! प्रतिक्रिया देताना अभिनेता म्हणतो...

Aditya Roy Kapur: 'आशिकी ३'मध्ये आदित्यऐवजी कार्तिक आर्यनची वर्णी! प्रतिक्रिया देताना अभिनेता म्हणतो...

Dec 14, 2023 01:12 PM IST

Koffee with Karan 8 Guest Aditya Roy Kapur: 'आशिकी ३' या चित्रपटात कार्तिक आर्यन याने आदित्यला रिप्लेस केले आहे. यावर आता आदित्यने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Aditya Roy Kapur And Kartik Aaryan
Aditya Roy Kapur And Kartik Aaryan

Koffee with Karan 8 Guest Aditya Roy Kapur: सध्या करण जोहर याचा 'कॉफी विथ करण' या शोचा आठवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसत आहेत. नुकत्याच एक भागात अभिनेता आदित्य रॉय कपूर याने करण जोहरच्या भन्नाट प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी आदित्य रॉय कपूर याच्यासोबत अर्जुन कपूर देखील या शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी करण जोहर याने आदित्य रॉय कपूर याला 'आशिकी ३' या चित्रपटाविषयी प्रश्न विचारले. अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी 'आशिकी २' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. मात्र, आता 'आशिकी ३' या चित्रपटात कार्तिक आर्यन याने आदित्यला रिप्लेस केले आहे. यावर आता आदित्यने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

'आशिकी २'च्या यशानंतर आता निर्माते 'आशिकी ३' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, या चित्रपटाचा मुख्य अभिनेता म्हणून कार्तिक आर्यनच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 'कॉफी विथ करण'मध्ये आलेल्या आदित्य रॉय कपूरला करण जोहर याने याच चित्रपटाबद्दल प्रश्न करत, त्याची प्रतिक्रिया मागितली. यावर आदित्य रॉय कपूर याने देखील हसत हसत अतिशय संपर्क असे उत्तर दिले आहे. होस्ट करण जोहरने आदित्य रॉय कपूरला विचारले की, 'आशिकी ३मध्ये दुसऱ्याच एका अभिनेत्याला कास्ट करण्यात आले आहे, याबद्दल तुला कसे वाटते. अर्थात जेव्हा कोणी तुमची जागा घेत आणि कथा पुढे नेतं, तेव्हा कसं वाटतं?'

करण जोहरच्या या प्रश्नावर उत्तर देताना आदित्य रॉय कपूरने म्हटले की, 'मला वाटतं कार्तिक आर्यन या चित्रपटासाठी अतिशय योग्य अभिनेता आहे. या चित्रपटात आता माझी असण्याची काही शक्यताच नव्हती. कारण, माझ्या पात्राचा दुसऱ्या भागात मृत्यू झाला होता. त्यामुळे आता तो परत कसा येईल?' पुढे आदित्य रॉय कपूर म्हणाला की, 'मी मेलोय, तर आता चित्रपटात पार्ट कसा येईन? हा माझा आत्मा कदाचित परत येऊ शकतो.' यावर करण जोहर गमतीने म्हणाला की, 'हो, तो येऊन कार्तिक आर्यनला त्रास देईल.' आपल्या ऐवजी कार्तिक आर्यन या भूमिकेसाठी कसा योग्य आहे, हे सांगत आदित्यने आपले मत व्यक्त केले आहे.

Whats_app_banner