Koffee with Karan 8 Deepika-Ranveer: 'कॉफी विथ करण'चा ८वा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात बॉलिवूडची हिट जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत. यावेळी त्यांनी आपली लव्हस्टोरी देखील चाहत्यांसोबत शेअर केली आहे. रणवीर पहिल्याच नजरेत दीपिकावर भाळला होता, याचा खुलासा त्याने स्वतः केला होता. संजय लीला भन्साळी यांच्या 'रामलीला' या चित्रपटाच्या सेटवर त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली होती. या चित्रपटात दोघांवर एक किसिंग सीन देखील शूट झाला होता. मात्र, या सीनमध्ये एक मोठी गडबड झाली होती.
अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची प्रेमकहाणी सुरू झाली तेव्हा ते संजय लीला भन्साळी यांच्या 'रामलीला' या चित्रपटात काम करत होते. त्यांची पहिली भेट ही संजय लीला भन्साळी यांच्या घरी झाली होती. रणवीर सिंह आणि दीपिका संजय लीला भन्साळी यांच्या घरी गेले होते. त्यावेळी दीपिकाने पांढऱ्या रंगाचा चिकनकारी कुर्ता परिधान केला होता. संजय लीला भन्साळी यांचे घर अगदी समुद्राशेजारी आहे. त्यामुळे दीपिकाने दरवाजा उघडताच तिचे केस हवेने हलके उडू लागले होते. तिला असं पाहताच रणवीर सिंह भान विसरून गेला होता. यानंतर दोघांनी एकत्र बसून कथा ऐकली आणि एकत्र लंच केला. यानंतर दोघांमध्ये छान मैत्री झाली होती. रामलीला या चित्रपटात या दोघांवर अनेक इंटिमेट सीन्स आणि किस सीन्स होते.
या चित्रपटातील किसचा देखील एक किस्सा होता. चित्रपटातील सीन असा होता, ज्यात दीपिका आणि रणवीर एकमेकांना किस करत असतात, त्यावेळी त्यांना सावध करायला खालून एक दगड मारला जातो. मात्र, या सीनवेळी दोघे एकमेकांना किस करण्यात इतके गुंग होऊन गेले होते की, त्यांना दगड मारलेला कळलाच नाही. या चित्रपटातील सीन्स दरम्यान त्यांची केमिस्ट्री सगळ्यांनाच दिसू लागली होती. अनेकदा दीपिका रणवीरसोबत एकांतात दिसायची. तर, संजय लीला भन्साळीही दोघांना मोकळा वेळ द्यायचे. २०१५मध्ये अखेर रणवीर सिंहने दीपिकाला प्रपोज केला. दीपिकाच्या मनात कुणी दुसरी व्यक्ती बसू नये, यासाठी त्याने थेट लग्नाची मागणी घातली होती. तर, २०१८मध्ये त्यांनी इटलीमध्ये लग्नगाठ बांधली.
संबंधित बातम्या