कॉफी विथ करण हा शो कायमच कलाकारांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. या शोमध्ये हजेरी लावणारे कलाकार हे कायमच त्यांच्या आयुष्यातील खुलासे करताना दिसतात. करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या आठव्या सिझनमध्ये नुकताच अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीने हजेरी लावली. या शोमध्ये दोघांनीही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. मुलगी न्यासाच्या ट्रोलिंगबाबत देखील करणने या शोमध्ये अजयला विचारले. तसेच अजयने न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणबाबत देखील वक्तव्य केले.
करण जोहरने अजला 'न्यासा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का?' असा प्रश्न विचारला. त्यावर अजयने उत्तर देत, "सध्या तिला चित्रपटसृष्टीत येण्याची इच्छा नाही. पण भविष्यात काही बदल झाले तर ती त्याचा विचार करेल" असे म्हटले.
वाचा: तुझ्याकडे भाकरवडी आहे, पुण्याची आहेस?; 'ओले आले'चा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित
पुढे करणने न्याला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते याविषयी अजयला विचारले. "न्यासाला हे अजिबात आवडत नाही. मलाही हे आवडत नाही. पण तुम्ही ते बदलू शकत नाही. त्यासोबत जगावे लागेल. काही लोक तुमच्याबद्दल निरर्थक बोलतात याचा अर्थ जग तुमच्याबद्दल असेच विचार करते असे नाही. तुम्ही लोकांबद्दल चांगल्या गोष्टी लिहिता, पण ते वाचण्यात कोणालाच रस नाही" असे अजय देवगण म्हणाला. यावर रोहित शेट्टी म्हणाला, 'प्रत्येकजण ट्रोल होत आहे.'
कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या आठव्या सिझनमध्ये आतापर्यंत दीपिका पादुकोण,रणवीर सिंह, बॉबी देओल, सनी देओल, आलिया भट्ट, करीना कपूर,वरुण धवन,सिद्धार्थ मल्होत्रा, राणी मुखर्जी, काजोल, विकी कौशल, कियारा आडवणी,अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. त्यानंतर आता अजय देवगण आणि रोहित शेट्टी या शोमध्ये सहभागी झाले.
संबंधित बातम्या