सध्या चित्रपटगृहांमध्ये 'स्त्री २' या चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. स्त्री २ प्रमाणेच आणखी एक हॉरर कॉमेडी चित्रपट काही महिन्यांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. मुंज्या असं या चित्रपटाचं नाव होतं. या चित्रपटाने प्रेक्षकांना हसवण्याबरोबरच घाबरवले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभले. मात्र, काही लोकांना हा चित्रपट चित्रपटगृहात पाहता आला नाही. जर तुम्हीही हा चित्रपट पाहू शकत नसाल तर आता तुम्ही ओटीटीवर पाहू शकता.
शर्वरी वाघच्या मुंज्या या चित्रपटाचे ओटीटीवर स्ट्रीमिंग सुरू झाले आहे. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार प्रदर्शित झाला आहे. डिज्नीप्लस हॉटस्टारने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. त्यांनी अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर, 'आम्ही मुंज्या या चित्रपटाचे डिझ्नेप्लस हॉटस्टार या आमच्या ओटीटी चॅनेलवर स्ट्रीमिंग सुरु केले आहे. तुम्हाला मुंज्याची आठवण आली? तो त्याच्या मुन्नीला शोधायला निघाला आहे... मुन्नीने सावध रहावे' असे म्हणते चित्रपटातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.
'मुंज्या' हा चित्रपट ७ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग, सत्यराज, तरनजोत सिंग यांसारखे कलाकार या चित्रपटात झळकले आहेत. अभय वर्मा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव बिट्टू आहे. तर अभिनेत्री शर्वरी वाघ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या या चित्रपटातील लूकने सर्वांची मने जिंकली आहेत. या पहिल्यावहिल्या चित्रपटाने शर्वरीला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले आहे.
वाचा: अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश
चित्रपटात मुंज्या एक राक्षस आहे ज्याला लग्न करायचे आहे. तो लहानपणीच मरण पावतो, त्यानंतर तो मुंज्या बनतो. अभय वर्मा हे या मुंज्याचे नातेवाईक आहेत. बिट्टू जेव्हा आपल्या गावी पोहोचतो, तेव्हा त्याची भेट मुंज्याशी होते. त्यानंतर मुंज्या बिट्टूला घेऊन शहरात येतो आणि त्याला मुन्नीला शोधायला सांगतो. त्यासाठी तो बिट्टूला त्रासही देतो. या सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला खूप आवडणार आहे आणि तुम्हाला हसवण्यासोबतच हा सिनेमा तुम्हाला घाबरवणारही आहे.