मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shark Tank India: 'शार्क टँक इंडिया ३' येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

Shark Tank India: 'शार्क टँक इंडिया ३' येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 19, 2024 08:42 AM IST

Shark Tank Season 3: ‘शार्क टँक इंडिया’च्या मागच्या दोन सीझनला तुफान प्रतिसाद मिळाल्यामुळे आता या शोचा पुढचा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shark Tank Season 3
Shark Tank Season 3

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेला ‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमाचा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा आहे. या नव्या सिझनची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये कार्यक्रमाबाबत उत्सुकता शिगेला गेली होती. या नव्या सीझनमध्ये कार्यक्रमातील काही जुने परीक्षकांसोबतच नवीन परीक्षक देखील दिसणार आहेत. चला जाणून घेऊया हा कार्यक्रम कधी आणि कुठे पाहाता येणार आहे.

नुकताच ‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनचा प्रोमो समोर आला आहे. हा तिसरा सिझन २२ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता सोनी टीव्ही वाहिनीवर या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिववर देखील प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येणार आहे.
वाचा: विद्या बालन होणार आई? प्रेग्नंसीच्या चर्चांवर सोडले मौन

यंदाच्या सिझने काय आहे वेगळेपण?

‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमात यंदा सहा ऐवजी १२ परीक्षक असणार आहेत. अझहर इक्बाल, दीपंदर गोयल, वरुण दुआ, रॉनी स्क्रूवाला, राधिका गुप्ता आणि रितेश अग्रवाल , अमन गुप्ता, अमित जैन, नमिता थापर, अनुपमा मित्तल, पियुष बन्सल, विनीता सिंह हे उद्योजक या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

देशाच्या कानाकोपऱ्यातील उद्योजक, नवोन्मेष्कारी, उत्साही व्यावसायिक यांना सहभागी होण्यासाठी व आपले स्वप्न वास्तवात आणण्यासाठी 'शार्क टँक इंडिया' हा कार्यक्रम योग्य ठरतो. या कार्यक्रमामध्ये व्यवसाय करणारे लोक येतात. हे लोक शोमधील परीक्षकांना त्यांची बिझनेस आयडिया आणि त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटर्जीबद्दल सांगतात. जर या बिझनेस आयडिया परीक्षकांना आवडल्या तर परीक्षक त्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करतात.

WhatsApp channel

विभाग