मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अखेर सई ताम्हणकरने दिली प्रेमाची कबुली, पोस्टवरील कमेंट चर्चेत
सई ताम्हणकर
सई ताम्हणकर (HT)
26 June 2022, 9:33 ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
26 June 2022, 9:33 IST
  • सई कोणाला डेट करते जाणून घ्या

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि हॉट अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. (Sai tamhankar) २५ जून रोजी सईने तिचा ३६वा वाढदिवस साजरा केला. सईला तिच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या. पण सईचा कथित बॉयफ्रेंड अनिश जोगने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सईच्या वाढदिवसानिमित्त निर्माता अनिश जोगने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने सईचे काही फोटो घेऊन एक व्हिडीओ तयार केला होता. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत त्याने, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅजिक! तू हे युद्ध जिंकावे अशी माझी इच्छा आहे' या अशायाचे कॅप्शन दिले होते.

अनिशने शेअर केलेल्या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधले होते. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत सईला शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच सईने देखील या पोस्टवर कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधले. सईने 'लव्ह यू' अशी कमेंट करत प्रेमाची कबुली दिली.

यापूर्वी सईने अनिशसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोला दिलेल्या कॅप्शनने अनिश आणि सई यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. आता सईने वाढदिवशी अनिशच्या पोस्टवर केलेल्या कमेंटने सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. सई आणि अनिशने आजवर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामध्ये ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’, YZ, ‘टाइम प्लीज’ या चित्रपटांचा समावेश आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग