Anant Ambani Wedding Video: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. १ मार्च पासून त्याच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड, हॉलिवूड आणि राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. हॉलिवूड गायिका रिहाना देखील उपस्थित होती. आता रिहानाने या कार्यक्रमासाठी किती मानधन घेतले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
अनंत-राधिका यंदा जुलै महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. पण त्याआधी १ मार्च ते ३ मार्चपर्यंत गुजरातमधील जामनगरमध्ये त्यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. ज्याप्रमाणे मुकेश अंबानींनी मोठा मुलगा आकाश अंबानीच्या लग्नात जगप्रसिद्ध गायिका बियोंसेला परफॉर्मन्साठी बोलावले होते. त्याप्रमाणे छोट्या मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाला मुकेश अंबानींनी बोलावले आहे. पण रिहानाने मुकेश अंबानी यांच्या कार्यक्रमातील काही तासांसाठी किती मानधन घेतले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तिने घेतलेल्या मानधनाचा आकडा वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
वाचा: ‘भिडे मास्तरां’ची लेक लग्न बंधनात अडकणार; झील मेहताच्या विवाह सोहळ्याची झाली सुरुवात!
डेली मेलच्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांनी अनंत-रिहाना यांच्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्मन्साठी रिहानाला तब्बल ५२ कोटी रुपये दिले आहेत. तसेच या संपूर्ण कार्यक्रमावर एक हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. याशिवाय कॅटरिंगवर १६५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी १९ जानेवारी रोजी राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरु होती. आता १-३ मार्च रोजी लग्नापूर्वीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर १२ जुलै रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मुंबईत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.