पतीच्या निधनानंतर खचून गेल्या होत्या नीना कुलकर्णी, आज दोन्ही मुले आहेत करिअरमध्ये यशस्वी-know about neena kulkarni personal life son and daughter ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  पतीच्या निधनानंतर खचून गेल्या होत्या नीना कुलकर्णी, आज दोन्ही मुले आहेत करिअरमध्ये यशस्वी

पतीच्या निधनानंतर खचून गेल्या होत्या नीना कुलकर्णी, आज दोन्ही मुले आहेत करिअरमध्ये यशस्वी

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 30, 2024 08:44 PM IST

Neena Kulkarni: अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची मुले काय करतात असा प्रश्न सर्वांना नेहमीच पडतो. चला जाणून घेऊया त्याविषयी

Neena Kulkarni
Neena Kulkarni

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नीना कुळकर्णी हे नाव कोणाला माहीत नसेल असा एकही व्यक्ती सापडणे मुश्कीलच. नाटक, मराठी व हिंदी मालिका, चित्रपट अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. पण नीना यांच्या खासगी आयुष्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. पतीच्या निधनानंतर नीना या कठीण काळातून जात होत्या. दोन्ही मुलांचा सांभळ करण्यासाठी त्यांना काम करावे लागत होते. चला जाणून घेऊया नीना कुलकर्णी यांच्या खासगी आयुष्याविषयी...

पतीच्या निधनानंतर एकट्या पडल्या होत्या नीना कुलकर्णी

नीना कुलकर्णी यांचे पती दिलीप कुलकर्णी हे देखील एक लोकप्रिय अभिनेते होते. दुर्दैवाने दिलीप यांचे २००२ साली हृदयविकाराने निधन झाले. पतीच्या निधनानंतर नीना एकट्या पडल्या होत्या. दोन्ही मुलांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. नीना कुलकर्णी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचं नाव दिवेश आणि मुलीचं नाव सोहा असं आहे. नीना यांची मुले काय करतात चला जाणून घेऊया...

पतीची साथ सुटल्यानंतर न खचता आपल्या दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी नीना कुलकर्णी धडपड करत राहिल्या. अभिनय क्षेत्रातील घोडदौड सुरू ठेवत मुला-मुलींचे करिअर घडवण्यासाठी त्यांनी दिवस रात्र एक केली. आपल्या आईच्या कष्टाचं चीज करत मुलांनी देखील आईची स्वप्ने पूर्ण केली. नीना कुलकर्णी यांची मुलगी सोहा आज एका बड्या चॅनलची हेड आहे.

नीना कुलकर्णी यांच्या मुलीविषयी

नीना कुलकर्णी यांची मुलगी सोहा सोनी मराठी या चॅनेलमध्ये क्रिएटीव्ह डायरेक्टर फिक्शन म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. सोनी मराठीसाठी अनेक लोकप्रिय मालिकांची निर्मिती तिने केली आहे. या व्यक्तिरित ती ऍनिमल कम्युनिकेटर म्हणून देखील काम करते. ऍनिमल कम्युनिकेटर म्हणजे प्राण्यांचे विचार ऐकू, बोलणं अनुभवू आणि पाहू शकणारी व्यक्ती. पेट whisperar त्यासाठी टेलिपॅथी चा वापर करतात असे म्हटले जाते. सोहाचं पेटिफाइड नावाचं इंस्टाग्राम अकाउंट देखील आहे. तिने अनेक सेलिब्रिटीच्या पेंट्स सोबत कम्युनिकेट करण्याचं काम केलं आहे .

नीना कुलकर्णी यांच्या मुलाविषयी

नीना कुलकर्णी यांचा मुलगा दिवीज हा देखील अॅडफिल्म दिग्दर्शन क्षेत्रात कार्यरत आहे. 'द पॅक’ या प्रोडक्शन हाऊससाठी स्टोरी एक्गेजरेटर म्हणून काम करतोय. त्याने कॅडबरी, तनिष्क सारख्या ब्रॅण्डसाठी अॅडफिल्म दिग्दर्शन केले आहे. याशिवाय तो एक उत्तम क्रिकेटपटू आणि फोटोग्राफर सुद्धा आहे. त्याला ट्रॅव्हलिंगची आवड असून तो वेगवगेळ्या ठिकाणचे भटकंतीचे फोटोज त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत असतो.
वाचा: पतौडी शाही पॅलेस बनणार म्यूझियम? सैफ अली खानने सांगितले सत्य, वाचा…

नीना कुलकर्णी यांच्या कामाविषयी

अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी ‘चौकट राजा’ चित्रपटात झळकलेले अभिनेते दिलीप कुलकर्णी यांच्याशी लग्न केलं.दिलीप कुलकर्णी यांनी ‘सर्वसाक्षी’, ‘विनायक’,’आई’ या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं होतं. पती दिलीप कुलकर्णी याचं २००२ मध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि त्या निराधार झाल्या.

Whats_app_banner
विभाग