मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कोण आहेत अशोक सराफ यांचे बंधू सुभाष सराफ? जाणून घ्या
अशोक आणि सुभाष सराफ
अशोक आणि सुभाष सराफ (HT)

कोण आहेत अशोक सराफ यांचे बंधू सुभाष सराफ? जाणून घ्या

24 June 2022, 11:01 ISTAarti Vilas Borade

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर अशोक सराफ यांच्यासोबत त्यांचे बंधू सुभाष सराफ देखील दिसणार आहेत.

सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात मराठी मनोरंजनसृष्टी ज्यांना 'अशोक मामा' म्हणून ओळखते असं अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ उपस्थित राहणार आहेत. त्यांना या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे. या कार्यक्रमात अशोक मामांसोबत त्यांचे बंधू सुभाष सराफ देखील दिसणार आहेत. त्यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

पंढरपूरजवळील एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करणार्‍या आणि त्यांना आधार देणार्‍या प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित 'पालवी' या सेवाभावी संस्थेसाठी अशोक सराफ 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. यावेळी त्यांचे धाकटे बंधू सुभाष सराफ आणि पत्नी निवेदिता सराफ यांच्या भगिनी डॉ. मिनल परांजपे हेदेखील त्यांच्यासह खेळात सहभागी होणार आहेत.
आणखी वाचा : 'इंग्लिश गाण्यावर लावणी करायला लावेन', झोलझालचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

अशोक सराफ यांचे धाकटे बंधू सुभाष सराफ हे व्यवसायाने सीए आहेत. गेली अनेक वर्षे ते मुंबईत प्रॅक्टिस करत आहेत. अशोक सराफ यांच्या करिअरमध्ये सुभाष यांचा मोलाचा वाटा असून अनेक जुन्या आठवणींना 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर उजाळा देण्यात आला. मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अशोक मामा बँकेत नोकरी करायचे आणि एकीकडे नाटकाचे दौरे करायचे. त्या वेळी बँकेत खोटं मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी सुभाष यांना पाठवण्यात यायचे. असे अनेक मजेदार किस्से आणि आठवणी मामा व त्यांचे बंधू यांनी या विशेष भागात सांगितले.

विभाग