टाळ्या अन् शिट्ट्यांसह चाहत्यांचा जल्लोष; ‘पठाण’मध्ये सलमानच्या चित्रपटाचा टीझर रिलीज!
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser: शाहरुखच्या चित्रपटादरम्यान सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा टीझर पाहायला मिळाला आहे.
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. एकीकडे या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना आता चाहत्यांचा आनंद आणखी दुणावला आहे. शाहरुखच्या चित्रपटादरम्यान सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा टीझर पाहायला मिळाला आहे. सलमान आणि शाहरुखच्या चित्रपटांचा हा मिलाफ पाहून प्रेक्षक देखील आनंदी झाले आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचा टीझर अद्याप सोशल मीडिया आणि यूट्यूबवर रिलीज झालेला नव्हता. या आधी या चित्रपटाचं शीर्षक जाहीर करण्यात आलं होतं. सोबतच सलमान खानचा लूक रिलीज करण्यात आला होता. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज करून चाहत्यांना सरप्राईज देण्यात आलं आहे. याशिवाय ‘पठाण’ या चित्रपटात सलमान खानाचा कॅमिओ रोल देखील आहे.
‘पठाण’ हा चित्रपट पाहताना सलमान खानच्या चित्रपटाचा टीझर पाहून चाहत्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून जल्लोष केला आहे. या दरम्यानचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सगळे चाहते देखील आतुर झाले होते. अखेर चाहत्यांची ही प्रतीक्षा आज संपली आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी सकाळी ६ वाजल्यापासून या चित्रपटाच्या शोला सुरुवात झाली आहे. सध्या सगळीकडे ‘पठाण’ची जोरदार चर्चा सुरू आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला करणार आहे. चित्रपटाच्या कथानकासह या चित्रपटातील गाण्यांनी देखील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू करेल, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.