भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आजवर अनेक गायक, अभिनेते, दिग्दर्शक होऊन गेले. पण ज्याची बरोबरी आजवर कुणीही करू शकलेलं नाही आणि कुणी करू शकतही शकत नाही असे अभिनेते म्हणजे किशोर कुमार. त्या काळातील अतिशय प्रभावशाली व्यक्तिमहत्व म्हणून किशोर कुमार ओळखले जायचे. आज ४ ऑगस्ट रोजी कुमार यांचा वाढदिवस आहे. किशोर कुमार यांच्या कामाविषयी आजवर लाखो लेख लिहिले गेले, पण त्यांच्या खासगी आयुष्याविषयी फार कुणाला माहिती नाही. चला आज जाणून घेऊया...
किशोर कुमार यांचे परदेशात घर बांधण्याचे स्वप्न होते. पण त्यांचे ते स्वप्न अधुरेच राहिले. ४ ऑगस्ट १९२९ रोजी मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात जन्मलेल्या किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार होते. पण त्यांना ओळख मिळाली ती फक्त त्यांच्या पडद्यावरील नाव किशोर कुमारने. किशोर यांच्या जीवनाबद्दल बोलायचं तर त्यांची कथा एका हिंदी चित्रपटापेक्षा कमी नव्हती. प्रेम, शोकांतिका, नाटक, अॅक्शन, सर्व काही त्यांच्या आयुष्यात होते. पण किशोर कुमार यांचे एक स्वप्न होते की त्यांच्या मूळ गावी खांडव्यात व्हेनिससारखे घर बांधायचे. तिथून छान निसर्ग दिसेल आणि आजूबाजूने वाहणारे पाणी पाहता येईल. यासाठी त्यांनी काम देखील सुरू केले. त्यांनी कामगारांना त्यांच्या बंगल्याभोवती कालवा खोदायला सांगितला. हे उत्खनन अनेक महिने चालले.
घराचे काम सुरु असताना काही काळानंतर खोदताना कामगारांना एके ठिकाणी एक मानवी सांगाडा सापडला. खोदकामात त्यांना मानवी हात सापडला. त्यामुळे कामगारांनी खोदकाम करण्यास नकार दिला. त्यामुळे सुंदर घर बांधण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले.
किशोर कुमार यांनी १९४६मध्ये त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. किशोर कुमार यांना अभिनय फरसा आवडत नव्हता. शूटिंगदरम्यान ते अनेकदा डायलॉगही विसरायचे. अशावेळी अशोक कुमार त्यांना खूप फटकारायचे. ते जरी चित्रपटात अभिनय करत असले, तरी त्यांचं गायक होण्याचं स्वप्न मात्र जिवंत होतं. १९४८मध्ये त्यांनी खेमचंद्र प्रकाश यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘जिद्दी’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा गाणे गायले. ‘मरने की दुआं क्यूं मांगू, जीने की तमन्ना कौन करे’ असे या गाण्याचे बोल होते. या गाण्यानंतर किशोर कुमार यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर संगीतकार एसडी बर्मन यांची साथ मिळाल्यावर किशोर कुमार यशाचा टप्पा गाठू लागले. किशोर कुमार यांना किशोर दा या नावानेही ओळखले जाते.
वाचा: 'हापशीवर होणाऱ्या भांडणापेक्षा हे बेकार', अभिनेत्याची सूरजला पाठिंबा देत नवी पोस्ट
किशोर कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांचे सर्वांनी कौतुक केले आहे. कुणाला त्यांच्या गायकीची, कुणाला त्यांच्या अभिनयाची तर कुणाला त्यांच्या मस्तमौला शैलीची भुरळ पडली. किशोर कुमार यांनी संगीताचे औपचारिक शिक्षण कधी घेतले नाही, पण देश-विदेशातील चाहते आजही त्यांच्या गाण्यांवर फिदा आहेत.