मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kiran Mane: चॅनेलचा दबाव झुगारून...; ‘मुलगी झाली हो’चा उल्लेख करत किरण मानेची पोस्ट

Kiran Mane: चॅनेलचा दबाव झुगारून...; ‘मुलगी झाली हो’चा उल्लेख करत किरण मानेची पोस्ट

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 02, 2024 08:50 AM IST

Kiran Mane Post: अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेचा उल्लेख केला आहे.

Kiran mane
Kiran mane

Kiran Mane Social media Post: मुलगी झाली हो या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणजे किरण माने. या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. त्यानंतर ते बिग बॉस मराठीच्या घरात दिसले. सध्या किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत कोणत्या ना कोणत्या विषयावर त्यांचे मत मांडताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर किरण माने यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेचा उल्लेख केला आहे.

काही दिवसांपूर्वी किरण माने यांनी ‘रमा राघव’ मालिकेच्या सेटवर जाऊन प्राजक्ता केळकर आणि श्वेता आंबीकर या दोन जुन्या मैत्रिणींची भेट घेतली. यापूर्वी या तिघांनी ‘मुलगी झाली हो’ मालिकेत भूमिका साकारली होती. मुलगी झाली हो मालिकेत काम करत असताना अचानक एक दिवस किरण माने यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. या पार्श्वभूमीवर त्यांनी आता पोस्ट शेअर केली आहे.
वाचा: ‘तारक मेहता..’ मालिकेतील पहिली ‘सोनू’ आठवतेय का? ‘या’ कारणामुळे मालिकेतून झाली होती आऊट!

Kiran Mane Social media Post: मुलगी झाली हो या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणजे किरण माने. या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. त्यानंतर ते बिग बॉस मराठीच्या घरात दिसले. सध्या किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत कोणत्या ना कोणत्या विषयावर त्यांचे मत मांडताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर किरण माने यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेचा उल्लेख केला आहे.

काही दिवसांपूर्वी किरण माने यांनी ‘रमा राघव’ मालिकेच्या सेटवर जाऊन प्राजक्ता केळकर आणि श्वेता आंबीकर या दोन जुन्या मैत्रिणींची भेट घेतली. यापूर्वी या तिघांनी ‘मुलगी झाली हो’ मालिकेत भूमिका साकारली होती. मुलगी झाली हो मालिकेत काम करत असताना अचानक एक दिवस किरण माने यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. या पार्श्वभूमीवर त्यांनी आता पोस्ट शेअर केली आहे.
वाचा: ‘तारक मेहता..’ मालिकेतील पहिली ‘सोनू’ आठवतेय का? ‘या’ कारणामुळे मालिकेतून झाली होती आऊट!|#+|

किरण मानेची पोस्ट

काही नातीच अशी असतात, ज्यांची कित्येक काळ भेट नाही झाली तरी ती ताजी टवटवीत राहतात! तब्बल दोन वर्षांनंतर प्राजक्ता केळकर आणि श्वेता आंबीकर भेटल्या. ते ही अचानक ‘रमा राघव’ च्या सेटवर. किती बोलू आणि किती नको असं झालं…धमाल केली आम्ही.

‘मुलगी झाली हो’च्या वेळी माझ्यावर खोट्या आरोपांच्या फैरी झडत असताना… अचानक स्वत:च्या करिअरची पर्वा न करता माझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहीलेल्या या माझ्या जिगरी मैत्रीणी! या दोघींसोबत शितल गिते आणि गौरी सोनारही होत्या. “किरणसर, वेळ पडली तर अभिनय सोडू पण, तुमच्यावर विनाकारण होणारे आघात आता गप्प बसून पाहू शकत नाही. आम्ही तीन वर्ष रोज पाहतोय तुम्हाला. भल्या माणसाची ही खोटी बदनामी आम्हाला आता सहन नाही होत.” असं म्हणत प्रोडक्शन हाऊस, चॅनलचा दबाव झुगारून जाहीरपणे सगळ्या न्यूज चॅनलवर या रणरागिणी निर्भिडपणे ‘सत्य’ बोलल्या.

माझ्यासाठी आयुष्यातला तो अविस्मरणीय आणि अद्भूत क्षण होता. जगात स्त्रियांना आदर आहे तो अशा निडर सावित्रीच्या लेकींमुळेच.

प्राजक्ता-श्वेता, तुम्हाला कामात बिझी असलेलं पाहून लै लै लै भारी वाटलं… आनंदी रहा… खुश रहा… लब्यू

WhatsApp channel

विभाग