Kiran Mane: ईव्हीएम हॅक होतं किंवा अदलाबदली होते; महाराष्ट्राच्या विधानसभा निकालावर किरण मानेंची पोस्ट
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kiran Mane: ईव्हीएम हॅक होतं किंवा अदलाबदली होते; महाराष्ट्राच्या विधानसभा निकालावर किरण मानेंची पोस्ट

Kiran Mane: ईव्हीएम हॅक होतं किंवा अदलाबदली होते; महाराष्ट्राच्या विधानसभा निकालावर किरण मानेंची पोस्ट

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 25, 2024 11:00 AM IST

Kiran Mane post: विधानसभा निकालावर ठाकरे गटाचे नेते, अभिनेते किरण माने यांनी पोस्ट केली आहे. त्यांची पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Kiran Mane
Kiran Mane

Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मध्ये महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. एकीकडे या ऐतिहासिक विजयांचा आनंद व्यक्त होत आहे तर दुसरीकडे विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

किरण मानेची पोस्ट नेमकी काय?

किरण मानेने सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, 'ईव्हीएम हॅक होतं किंवा अदलाबदली होते, यावर १०० टक्के लोकांचा विश्वास बसलाय. सगळेच अस्वस्थ आहेत. संवेदनशील लोक, हे बंद होण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहिलं पाहिजे, म्हणून अस्वस्थ आहेत... कोडगे कारस्थानी लोकं, यावर बोलून का बिंग फोडकाय? हे तोंड बंद ठेवून निर्णय मान्य करा,म्हणून अस्वस्थ आहेत..!'

किरणे माने यांच्याविषयी

अभिनेते किरण माने हे ठाकरे गटाचे नेते आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुक २०२४मध्ये महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार केला होता. उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक सभेला ते हजर होते. तसेच किरण माने यांची खणखणीत भाषणे देखील चर्चेत होती. आता त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांसाठी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
वाचा : कोणी पत्नीचे दागिने गहाण ठेवले तर कोणी राहते घर; कर्जात बुडाले होते 'हे' मराठी कलाकार, पण...

विधानसभा निवडणुकीचा निकाल

भाजपने राज्यभरात १४९ जागांववर उमेदवार दिले होते, त्यातील १३२ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपचा विजयाचा स्ट्राईक रेट ८८ टक्क्यांच्या वर आहे तर काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. भाजपने सलग तिसऱ्यांदा शतकी मजल मारली आहे. २०१४ मध्ये भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या, तर २०१९ मध्ये १०५ जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे काँग्रेसची ही आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरीआहे. २०१४ मध्ये ४२ आणि २०१९ मध्ये ४४ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा केवळ १६ जागांवर समाधान मानावे लागत आहे. तर विधानसभा निवडणुकीत यंदा मनसेला मोठे अपयश मिळाले आहे. या निवडणुकीत मनसेला खातेही खोलता आले नाही.

Whats_app_banner