मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kiran Mane: शाहरुख खानमुळे किरण मानेंवर पडला लाईक्सचा पाऊस! नेमकं काय झालं? वाचा...

Kiran Mane: शाहरुख खानमुळे किरण मानेंवर पडला लाईक्सचा पाऊस! नेमकं काय झालं? वाचा...

Sep 11, 2023 01:50 PM IST

Kiran Mane Post On Jawan: शाहरुख खानमुळे किरण माने यांच्यावर तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी याबद्दल सांगितले आहे. पाहा नेमकं काय झालं...

Kiran Mane Post On Jawan
Kiran Mane Post On Jawan

Kiran Mane Post On Jawan: बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवर सध्या ‘जवान’ या चित्रपटाची हवा सुरू आहे. शाहरुख खानने या चित्रपटातून पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला आहे. मराठमोळ्या कलाकारांनी देखील शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे. ‘बिग बॉस मराठी ४’ फेम अभिनेते किरण माने हे देखील शाहरुख खानचे ‘डाय हार्ट’ चाहते आहेत. आता शाहरुख खानमुळे किरण माने यांच्यावर तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी याबद्दल सांगितले आहे. पाहा नेमकं काय झालं...

किरण माने हे सोशल मीडियावर नेहमीच शाहरुख खान याचं कौतुक करताना दिसतात. ‘जवान’च्या निमित्ताने देखील किरण माने यांनी अशीच एक पोस्ट केली होती. या पोस्टला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता किरण माने यांनी एक नवीन पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले की, ‘आग्गाग्ग्गगागा... एक लाखाच्या वर लाईक्स... पाचशेच्या वर कमेंट्स... दोन हजाराच्या वर शेअर्स... आणि तब्बल एक मिलीयन, म्हणजे दहा लाखाच्या वर व्ह्यूज! अजूनबी सुरुच आहे. ते ही माझ्या फेसबुक पोस्टवर!! इन्स्टा-युट्यूबवर नव्हे. नादखुळाच!!!’

ट्रेंडिंग न्यूज

Riteish Deshmukh: जिनिलीया पुन्हा आई होणार? व्हायरल व्हिडीओवर अखेर रितेश देशमुखने दिले स्पष्टीकरण! म्हणाला...

पुढे किरण माने यांनी लिहिले की, ‘...आजपर्यंत माझ्या कुठल्याही पोस्टचे लाईक्स मी मोजले नाहीत. हो, पण कोण लाईक करतंय आणि कमेंट्स काय येताहेत हे मात्र आवर्जून पहातो, यातून समविचारी लोक कळतात, जवळ येतात. विषारी घाण दूर जाते. नको असलेला कचरा बाहेर जाऊन, महाराष्ट्रभरात माझा मित्रमेळा पसरला तो यामुळेच... चाहते, प्रेम करणारी माणसं माझ्याशी संवाद साधू लागली. आयुष्य बहरून गेलं. काही जणांच्या दृष्टीनं हे 'आभासी जग' असो, मला मात्र यातून जिवंत, रसरशीत, हाडामासांचा, जीवाला जीव देणारा गोतावळा लाभला. माझ्यावर वाईट वेळ आली होती, तेव्हा अख्ख्या सोशल मिडीयानं आवाज उठवून भल्याभल्यांची हवा टाईट केलीवती, ती उगाच नाय.’

‘कालपासून मात्र माझ्या फेसबुक अकाऊंटवर छप्परतोड, आजपर्यंतचा रेकॉर्डब्रेक कहर झालाय! मी 'जवान'च्या स्क्रीनिंगच्या वेळचा एक व्हिडीओ शेअर केला, त्याला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे, देशभरातून नव्हे, आशियातून नव्हे, तर जगभरातून प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. श्रीलंका, बांग्लादेश, इंडोनेशिया, मलेशिया, पाकिस्तान, नेपाळ, साऊथ कोरीया, दुबई, म्यानमार, सौदी अरेबीया, इंग्लंड, अमेरीका, बल्गेरीया वगैरे वगैरे देशांमधले लोक माझ्या पोस्टवर आले. वर आकडे दिलेले आहेत. ते वाढतच चाल्लेत, 'जवान'च्या करीश्म्यासारखे. शारख्या, भावा तुझा स्पर्श ह्यो परीसाचा स्पर्श हाय... साध्या गोष्टीचबी सोनं करतोस तू... 'सिनेमा इंडीया' जगभरात लखलखतोय, झळाळतोय तुझ्या मिडास टच मुळं! रूंब रूंब रूंब नांद्री... आणि लब्यू लैच’, असं म्हणत त्यांनी शाहरुख खानचे आभार देखील मानले आहेत.

WhatsApp channel