Kiran Mane: मनोज जरांगे पाटलांच्या साताऱ्यातील सभेच्या पार्श्वभूमीवर किरण मानेंची पोस्ट, “कारस्थानी वर्चस्ववाद्यांना..."-kiran mane post for manoj jarange patil ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kiran Mane: मनोज जरांगे पाटलांच्या साताऱ्यातील सभेच्या पार्श्वभूमीवर किरण मानेंची पोस्ट, “कारस्थानी वर्चस्ववाद्यांना..."

Kiran Mane: मनोज जरांगे पाटलांच्या साताऱ्यातील सभेच्या पार्श्वभूमीवर किरण मानेंची पोस्ट, “कारस्थानी वर्चस्ववाद्यांना..."

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 18, 2023 01:07 PM IST

Kiran Mane Post for Manoj Jarange Patil: अभिनेते किरण माने यांनी यापूर्वी देखील मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी पोस्ट केली होती.

Kiran Mane Post for Manoj Jarange Patil
Kiran Mane Post for Manoj Jarange Patil

सातारा – मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून अनेक शहरात त्यांच्या सभा होत आहेत. नाशिकमध्ये त्यांनी १०१ एकर मैदानावर भव्य सभा होणार आहे. त्यानंतर त्यांची आज साताऱ्यात सभा आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेते किरण माने यांनी पोस्ट शेअर करत त्यांचे स्वागत केले आहे.

किरण मानेंनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर पोस्ट शेअर करत कौतुक केले आहे. त्यामध्ये त्यांनी संविधानाने दिलेली ताकद देखील दाखून दिली आहे. “संविधानाने सामान्य माणसाला दिलेली ताकद जरांगे पाटलांनी दाखवून दिली. कारस्थानी वर्चस्ववाद्यांना बहुजनांमधले भ्रष्टाचारी लोक हाताशी धरून ‘फोडा आणि राज्य करा’चा ब्रिटीशी डाव खेळावा लागतोय. पण तो ही हाणून पाडायला संविधानाने शिकवले आहे. जरांगे पाटील राजधानी सातार्‍यात तुमचे मनापासून स्वागत!” असे किरण माने यांनी म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
वाचा: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकार भोजनेची पुन्हा एण्ट्री

Kiran Mane Post
Kiran Mane Post

यापूर्वी किरण मानेंनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाचे समर्थन केले होते. त्यांनी या पोस्टमध्ये “जरांगे पाटील… या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. खरंतर असे पूर्वी घडणे सहज शक्य होते, कारण व्यवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पाहणार्‍या व्यवस्थेला तो धाक ‘दाखवण्याचे’ महान कार्य तुम्ही करत आहात! आम्हाला तुमची गरज आहे” असे म्हटले होते.

Whats_app_banner