मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  पळपुट्या गद्दारांना व त्यांच्यावर करोडो रूपये खर्च करणाऱ्या..; किरण मानेची पोस्ट
किरण माने
किरण माने (HT)
26 June 2022, 13:16 ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
26 June 2022, 13:16 IST
  • किरण मानेंनी पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होताना दिसत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातलं सरकार अल्पमतात आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मात्र, आघाडी सरकारमधील नेते सरकार अल्पमतात नसल्याचे दावे करत आहेत. अशातच सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर सर्वजण प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान, अभिनेते किरण माने यांनी केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. 'न्यूज चॅनलवाल्या माझ्या मित्रांनो, आम्हाला माहिती आहे तुम्हाला मालकाचे आदेश असतात. पण आता लै बील झालं. पळपुट्या गद्दारांना आणि त्यांच्यावर करोडो रूपये खर्च करणार्‍या फडतूसांना हिरो करणारे मोठेमोठे अर्ध्या तासांचे खोटे कार्यक्रम दाखवणं बंद करा... आमच्या सातार्‍याचा कोवळा तरूण काल देशासाठी शहीद झालाय. जम्मू काश्मीरच्या लेहमध्ये आपल्या आर्मीचं 'ऑपरेशन रक्षक' सुरू असताना, जवान सुरज शेळके याला वीरमरण आलं आहे' असे म्हटले आहे.
आणखी वाचा : सर्वात महागडा घटस्फोट! करिश्माला पतीकडून पोटगी म्हणून मिळतात 'इतके' रुपये

<p>किरण माने पोस्ट</p>
किरण माने पोस्ट (HT)

पुढे त्यांनी म्हटले की, 'फक्त २३ वर्ष वय असलेल्या माणदेशी मातीतल्या, खटावच्या सुपुत्रानं देशासाठी छातीवर गोळ्या झेलल्यात. त्याच्यावर एखादा अर्ध्या तासाचा कार्यक्रम दाखवा. त्याच्या मित्रांच्या, गांवातल्या लोकांच्या मुलाखती दाखवा. देशासाठी जीव ओवाळून टाकणार्‍यांची खरी 'पॅशन' दाखवा... लोकांना कळूद्या 'खरे हिरो' कसे असतात ते... सुरज, तुला कडकडीत सलाम ! जयहिंद.'

साताऱ्याच्या खटाव येथे राहणारा सूरज शेळके हा २३ वर्षीय जवान शहीद झाल्याने खटावमध्ये दुखाचे वातावरण आहे. सूरज शेळके आपल्या प्रशिक्षणानंतर अवघ्या तीन वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची पहिली पोस्टींग लेह लडाखमध्ये झाली होती. २३ वर्षाच्या वयात देशासाठी परमोच्च सेवा सूरज शेळके यांनी दिली आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी या जवानाचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग