Kiran Gaikwad Reveal Love Relationship: ‘देवमाणूस’ फेम अभिनेता किरण गायकवाड याने नुकतीच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेता किरण गायकवाड याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. किरण गायकवाड हा अभिनेत्री अस्मिता देशमुख हिच्या प्रेमात पडला आहे. अभिनेत्री अस्मिता देशमुख हिने ‘देवमाणूस’ या मालिकेत ‘डिम्पल’ अर्थात ‘डिम्पी’ची भूमिका साकारली होती. ‘देवमाणूस’ या मालिकेतील त्यांच्या भूमिका खूपच गाजल्या होत्या. या मालिकेत डिम्पलने डॉक्टरच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. तर, किरण गायकवाड याने डॉक्टर अजित ही भूमिका साकारली होती.
‘देवमाणूस’ ही मालिका संपल्यानंतर देखील हे कलाकार चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. आता त्यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. मात्र, तरीही त्यांचे चाहते चांगलेच गोंधळात पडले आहेत. किरण गायकवाड याने अभिनेत्री अस्मिता देशमुख हिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात गुलाबाचा गुच्छ आहे. तर, या फोटोसोबत कॅप्शन देताना किरण गायकवाडने लिहिले की, ‘ए फेब्रुवारी आहे.. आतातरी फायनली आपण सगळ्यांना सांगूयात का?’ यावरून दोघांमध्ये नक्की काय सुरू आहे, हे कुणालाच कळेनासं झालं आहे. दोघे खरंच एकमेकांना डेट करत आहेत की, त्यांचा एखादा नवा प्रोजेक्ट येणार आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
दोघांनी याविषयी अद्याप खुलासा केलेला नाही. मात्र, आता दोघांनी स्पष्टपणे ही गोष्ट सांगावी याची वाट चाहते बघत आहेत. तर, दुसरीकडे चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. दोघांच्या या पोस्टवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. ‘बातमी आनंदाची असणार एवढं मात्र नक्की.. खूप खूप शुभेच्छा’, ‘छान जोडी, ऑन स्क्रीन अन् ऑफ स्क्रीन दोन्हीकडे’, ‘भाऊ लवकर सांगा लई आतुरतेने वाट बघतोय’, ‘तुमच्या चाहत्यांचं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण केलं भैया साहेब...’, ‘आता लवकर सांगूनच टाका’, अशा कमेंट्स चाहत्यांनी त्यांच्या या पोस्टवर केल्या आहेत. आता नेमकं काय सुरू आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
मात्र, अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री अस्मिता देशमुख यांनी यावर अद्याप जाहीररीत्या काहीही म्हटलेले नाही. तर, दुसरीकडे काही जवळीची मंडळी त्यांना ‘लव्हबर्ड्स’ म्हणत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्यामुळे ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली आहे, असा कयास चाहते बांधत आहेत.
संबंधित बातम्या