हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियनहिने गणेशाच्या मूर्तीसोबत फोटो काढला, ज्यामुळे खळबळ उडाली. हा वाद वाढत असल्याचे पाहून किमने नंतर तो फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डिलीट केला. उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला किम कार्दशियन उपस्थित होती. किमचे लग्नातील फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हॉलिवूड सुपरस्टारसोबत फोटोही काढले. सुमारे ५ हजार कोटी रुपयांच्या या लग्नाची पाहुणी किम एका फोटोमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
किम कार्दशियन तिची बहीण क्लोई कार्दशियनसोबत या अनंत अबंनीच्या लग्नात दिसल्या होत्या. त्यानंतर त्या दोघींनीही रिसेप्शनला देखील हजेरी लावली. लग्नातून ब्रेक घेतल्यानंतर किम कार्दशियन मुंबईतील एका गणपती मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. त्यांनी मंदिरात देवाची सेवा केली. त्यानंतर तेथे काही फोटोशूट केले. किम कार्दशियन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून जेव्हा तिने गणपतीच्या मूर्तीसोबतचे फोटो शेअर केले तेव्हा खळबळ उडाली होती. या फोटोमध्ये किम गणपतीच्या मूर्तीचा प्रॉप म्हणून वापर करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर किमचा हा फोटो क्षणार्धात तुफान व्हायरल झाला. तो पाहून अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. किमने असे फोटोशूट करायला नको होते असे अनेकांनी म्हटले आहे. तर काहींनी तिला आपली संस्कृती माहिती नसली तरी ती समजून घेण्याची गरज होती असे देखील म्हटले आहे. वाद वाढत असल्याचे पाहून किमने हा फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरुन डिलिट करुन टाकला.
वाचा: 'तौबा तौबा'ची हूक स्टेप कतरिनाला आवडल्यानं विकीला आभाळ ठेंगणं; म्हणाला, ऑस्कर मिळाल्यासारखं वाटलं!
किमने शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने या फोटोवर कमेंट करत लिहिले की, ती अमेरिकन आहे आणि गणपतीसोबत अशी पोज देत आहे. त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा नसला तरी भारतीयांसाठी हा श्रद्धेचा प्रश्न आहे अशी संतप्त कमेंट केली आहे. दुसऱ्या एका युजरने किमच्या शेवटच्या पोस्टवर लिहिलं, "मी स्वाइप केले पण आता तो फोटो नाही. कदाचित किमने तो फोटो डिलिट करुन टाकला आहे" असे म्हटले. हा वाद वाढत असल्याचे पाहून किम कार्दशियनने तात्काळ ही पोस्ट डिलीट केली.
किमने मुंबईतील एका गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचे ठरवले होते. बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर किमने देवाच्या मूर्तीवर हात ठेवून काही पोझ दिल्या. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
संबंधित बातम्या