Viral Video: किली पॉलला ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ, गाणे गातानाचा मजेशीर व्हिडीओ केला शेअर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: किली पॉलला ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ, गाणे गातानाचा मजेशीर व्हिडीओ केला शेअर

Viral Video: किली पॉलला ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ, गाणे गातानाचा मजेशीर व्हिडीओ केला शेअर

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 18, 2024 06:57 PM IST

Gulabi Sadi Song Reel: सध्या सोशल मीडियावर किली पॉलचा मराठी गाणे गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

किली पॉलला ‘गुलाबी साडी’ गाण्याची भूरळ, गाणे गातानाचा मजेशीर व्हिडीओ केला शेअर
किली पॉलला ‘गुलाबी साडी’ गाण्याची भूरळ, गाणे गातानाचा मजेशीर व्हिडीओ केला शेअर

Kili Paul Sings Gulabi Sadi Song: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. पण सोशल मीडियामध्ये इतकी ताकद आहे की एखादी सर्वसामान्य व्यक्ती देखील रातोरात स्टार होते. पण ज्या प्रकारे त्या व्यक्तीला प्रसिद्धी मिळते ती प्रसिद्धी गमावण्याची देखील सोशल मीडियामध्ये ताकद आहे. सध्या सगळ्यांना सोशल मीडिया सेन्सेशन किली पॉल माहिती आहे. टांझानियाच्या किली पॉलचे प्रत्येक व्हिडीओ हे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. नुकताच किलीने एका मराठी गाण्यावरचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

आपण सध्या सोशल मीडियावर संजू राठोड व प्राजक्ता घाग यांच्या ‘गुलाबी साडी’ या गाण्याची क्रेझ पाहातोय. मराठी कलाकारांपासून ते बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने देखील या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यापाठोपाठ आता किली पॉलने देखील हे गाणे गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
वाचा: आशुतोष सांगणार मायाचे सत्य, काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये किली पॉल चारचाकी वाहन चालवताना दिसत आहे. ही गाडी चालवत असतानाच तो गुलाबी साडी गाणे गात आह आणि शूट करत आहे. ते पाहून नेटकऱ्यांचा संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी त्याला गाडी चालवताना शूट करु नकोस असे म्हटले आहे. तर काहींनी त्याने मराठी गाणे गायले म्हणून कौतुक केले आहे. 
वाचा: अभिनेत्री तेजश्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, शेअर केले फोटो

सोशल मीडिया सेन्सेशन किली पॉल

किली पॉल हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत व्हायरल होणारे रिल करत असतो. चाहते देखील किलीच्या प्रत्येक व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. किली खास करुन भारतीय संस्कृतीकडे आकर्षित होतो. तो अनेकदा बॉलिवूडवर रिल्स तयार करताना दिसतो. त्याला मराठी गाण्यांची देखील भूरळ पडल्याचे अनेकदा पाहायला मिळते.

सोशल मीडियावर लाखो चाहते

किलीचे सोशल मीडियावर जवळपास ८.१ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्याच्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती असते.जगभरातील अनेक लोक किली याला सोशल मीडियावर फॉलो करत असतात. किली सतत चाहत्यांचे मनोरंजन करत असल्यामुळे चाहते देखील त्याच्या नव्या व्हिडीओच्या प्रतीक्षेत असतात.

Whats_app_banner