मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  टांझानियाच्या किली पॉलचा मराठमोळा अंदाज, "मावळ आम्ही वादळ आम्ही" गाण्यावरील Video Viral

टांझानियाच्या किली पॉलचा मराठमोळा अंदाज, "मावळ आम्ही वादळ आम्ही" गाण्यावरील Video Viral

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 18, 2024 06:31 PM IST

Kili Paul Viral Video: किली पॉलने मराठमोळ्या गाण्यांवर शिल्स करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याचे हे रिल्स चाहत्यांच्या पसंतीला उतरताना दिसत आहेत.

Kili Paul
Kili Paul

सोशल मीडियावर आजकला बरेच सर्वसामान्य लोक रिल्स बनवून रातोरात स्टार झाले आहेत. या यादीमधील एक नाव म्हणजे टांझानियाचा किली पॉल. तो सतत सोशल मीडियावर रिल्स करुन शेअर करताना दिसतो. त्याचे हे रिल्स चाहत्यांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसतात. अनेकजण त्याच्या रिल्सवर कमेंट आणि लाइकचा वर्षाव करतात. सध्या सोशल मीडियावर किली पॉलचे मराठी गाण्यांवरील रिल्स चर्चेत आहेत.

किली पॉलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'शेर शिवराज' या ऐतिहासिक चित्रपटातील "मावळ आम्ही वादळ आम्ही" या गाण्यावर रिल्स बनवून शेअर केले आहेत. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्याच्या पसंतीला उतरताना दिसत आहे. किलीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने "भावा आपलं मन जिकलस तू,जय शिवराय" अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने "या जगातील प्रत्येक मराठी माणसाचे हृदय तू जिंकले आहेस" असे म्हणत कौतुक केले आहे.
वाचा: पतीचे परक्या मुलीसोबत संबंध? ईशा देओलच्या घटस्फोटाचे कारण आले समोर

किलीने अजूनही काही मराठी गाण्यांवर डान्स केला आहे. त्यामध्ये "काय सांगू राणी मला गाव सुटना" आणि "नांदण नांदण रमाचं नांदण" या गाण्याचा देखील समावेश आहे. किलीचे हे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

किली हा टांझानिया येथील आहे. तो अनेकदा बॉलिवूड गाण्यांवर व्हिडीओ करुन शेअर करत असतो. किली आणि त्याची किलीची बहीण नीमा हे दोघे सोशल मीडियावर विविध व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे इन्स्टाग्रामवर ६.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. सध्या त्यांच्या मराठी गाण्यांची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

WhatsApp channel