Khushboo Tawde Baby Girl: मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक असलेले अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. नुकतेच या जोडप्याला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. या आनंदाची बातमीने त्यांचे चाहते देखील खूप खूश झाले आहेत. खुशबू आणि संग्राम यांनी २०१८ मध्ये लग्न केले होते. नोव्हेंबर २०२१मध्ये त्यांना एक मुलगा झाला होता, ज्याचे नाव राघव आहे. आता त्यांच्या घरी आणखी एक नवी पाहुणी आली आहे.
याआधी, खुशबूने ऑगस्ट महिन्यात सोशल मीडियावरून दुसऱ्यांदा गर्भवती असल्याची खुशखबर दिली होती. ती त्यावेळी झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये काम करत होती. गर्भावस्थेच्या कारणाने तिने या मालिकेतून निरोप घेतला होता. जवळपास सातव्या महिन्यापर्यंत तिने या मालिकेत काम केले होते.
खुशबू आणि संग्राम यांच्या या आनंदाच्या बातमीनंतर मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. खुशबू तावडेची सहकलाकार वैशाली भोसलेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या नव्या पाहुणीच्या आगमनाची घोषणा केली आहे. खुशबू आणि संग्राम हे मराठी मनोरंजन विश्वातील एक आदर्श जोडपे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निःस्वार्थ प्रेमाचे लाखो चाहते उदाहरण देतात. या नव्या सदस्याच्या आगमनाने त्यांचे चौकोनी कुटुंब पूर्ण झाले आहे.
खुशबूने काही महिन्यांपूर्वी ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. ही मालिका सोडण्यामागील मुख्य कारण म्हणजे ती पुन्हा एकदा आई होणार होती. तिने आपल्या गरोदरपणाच्या सातव्या महिन्यापर्यंत या मालिकेत काम केले. मात्र, त्यानंतर तिने आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि बाळाच्या जन्मासाठी काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. खुशबूच्या जागी आता ‘उमा’ची भूमिका अभिनेत्री पल्लवी वैद्य साकारत आहे. पल्लवीने याआधीही अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
खुशबू आणि संग्रामची ओळख एकमेकांचे सहकलाकार म्हणून झाली होती. सुरुवातीला दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यांच्यात एकमेकांबद्दल खूप आदर आणि प्रेम होते. काळाच्या ओघात ही मैत्री प्रेमात बदलली. दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झाली आणि त्यांनी आपल्या भावना एकमेकांसोर व्यक्त केल्या. काही काळ डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे लग्न खूपच भव्यदिव्य पद्धतीने पार पडले. त्यांच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.