Khumasdar Natyancha Goda Masala: तिखट मसाले तयार करणार का नात्यांचा गोडा मसाला? नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Khumasdar Natyancha Goda Masala: तिखट मसाले तयार करणार का नात्यांचा गोडा मसाला? नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

Khumasdar Natyancha Goda Masala: तिखट मसाले तयार करणार का नात्यांचा गोडा मसाला? नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

Published Oct 03, 2023 07:52 AM IST

Khumasdar Natyancha Goda Masala TV Serial: एक-दोन नव्हे तर, सहा महिलांची गंमतीशीर कथा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Khumasdar Natyancha Goda Masala
Khumasdar Natyancha Goda Masala

Khumasdar Natyancha Goda Masala TV Serial: सध्या मालिका विश्वात अनेक नव्या मालिकांची भर पडत आहे. वेगळे विषय, हटके कथानक यामुळे मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. दरम्यान, आता आणखी एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘खुमासदार नात्यांच्या गोडा मसाला’ असे या मालिकेचे नाव असून, यातून प्रेक्षकांना एक नवं कथानक पाहायला मिळणार आहे. या मालिकेतून एक स्त्री प्रधान कुटुंब प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजपासून (३ ऑक्टोबर) दररोज रात्री ९ वाजता ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्त्रीप्रधान संस्कृतीचे गोडवे गाणारी एक नवी कोरी मालिका घेऊन ही आता सोनी वाहिनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'खुमासदार नात्यांच्या गोडा मसाला' असे नाव असलेली मालिका ३ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पुरुषाची जात वाईट असते असं म्हणणाऱ्या तेंडुलकर घरातील स्त्रियांच्या मनाचा खेळ या मालिकेतून उलगडणार आहे. एक-दोन नव्हे तर, सहा महिलांची गंमतीशीर कथा या मालिकेतून समोर येणार आहे. अभिनेता अनुज साळुंखे आणि अभिनेत्री महिमा म्हात्रे म्हणजेच ‘समर’ व ‘सानिका’ची फ्रेश जोडी मालिकेतून पहिल्यांदाच रुपेरी पडदा गाजवायला येणार आहे.

Viral Video: आधी सेल्फी काढला अन् मग कानाखाली लगावली; चाहतीने प्रभाससोबत ‘हे’ काय केलं! पहा व्हिडीओ

या स्त्रीप्रधान कथानक असलेल्या मालिकेचं लेखनही लेखिका श्वेता पेंडसे व रोहिणी निनावे यांनी केलं आहे. इतकंच नव्हे, तर या स्त्रीप्रधान मालिकेचं शीर्षक गीतही कोकण कलेक्टिव्ह या महिला ग्रुपने स्वरबद्ध केलं आहे. या मालिकेतील सहा स्त्रिया सर्वसामान्य स्त्रिया नसून, तिखट मसाल्यांच्या यादीत यांची नाव अचूक बसतील अशा आहेत. बरं हे असं असलं तरी हा मसाला कुटल्यानंतर त्याचा गोडा मसाला तयार होतो, हे ही तितकंच खरं आहे.

'खुमासदार नात्यांचा गोडा मसाला' मालिकेत अभिनेत्री नयना आपटे, रेवती लिमये, शर्वनी पिलये, महिमा म्हात्रे, सीमा देशमुख, दुर्वा देवधर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सगळ्या अभिनेत्रींनी साकारलेले प्रत्येक पात्र हे मसाल्यांप्रमाणे तिखट आहे. म्हणजेच जसं की, या मालिकेतील तेंडुलकरांच्या घरातील सानिका जरी शेंडेफळ असली तरी, तिची तऱ्हा ही लाल मिरचीसारखी आहे. तर, चाळिशीतल्या पल्लवी सदावर्ते अगदी लवंगप्रमाणे आहेत. तर, तिशीतल्या दिव्याची काळीमिरीसारखी तऱ्हा आहे. अशा या तिखट तऱ्हा असणाऱ्या महिला त्यांच्या घरी पुरुषांना स्थान मिळू देतील का?, हे पाहणं रंजक ठरेल. मालिकेत अनुज साळुंखे, विनय एडेकर, अमित खेडेकर, अजिंक्य जोशी या कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत.

Whats_app_banner