बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमारचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटताना दिसत आहेत. अक्षय कुमारच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कॉमेडी चित्रपटाने ओटीटीवर धडक दिली आहे. जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये आला तेव्हा लोकांना तो फारसा आवडला नव्हता. १०० कोटी रुपये बजेट असणारा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ ३९ कोटी रुपये कमावले. पण जेव्हापासून या चित्रपटाने ओटीटीवर धडक दिली आहे, तेव्हापासून हा चित्रपट नंबर १ वर ट्रेंड होताना दिसत आहे.
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे नाव 'खेल खेल में' असे आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह तापसी पन्नू, वाणी कपूर, फरदीन खान, अॅमी विर्क, प्रज्ञा जयस्वाल आणि आदित्य सील आहेत. नेटफ्लिक्स इंडियाच्या टॉप १० लिस्टमध्ये हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे
'खेल खेल में' हा चित्रपट नेटफ्लिक्सवरच नाही तर ट्विटरवरही ट्रेंड करत आहे. लोक या सिनेमाचं कौतुक करत आहेत. एका युजरने या चित्रपटाविषयी लिहिले की, 'खूप छान सिनेमा आहे.' तर दुसऱ्या एका यूजरने 'हा चांगला चित्रपट आहे यार. स्टारकास्टही चांगली आहे. चित्रपटाची संकल्पनाही चांगली आहे. अक्षय पाजीही अप्रतिम दिसत आहे' असे म्हणत कौतुक केले आहे. तिसऱ्या एका यूजरने, "मला तापसी पन्नू आणि अॅमी विर्क ची जोडी सर्वात मस्त वाटली. मजा आली" असे म्हटले आहे.
वाचा: तू हॉटेलमध्येच गाणे गा; अरिजीत सिंहची नक्कल करणाऱ्या स्पर्धकावर संतापला विशाल दादलानी
'खेल खेल में' या चित्रपटाची कथा तीन जोडप्यांभोवती (अक्षय-वाणी, एमी-तापसी आणि आदित्य-प्रज्ञा) आणि एक मित्र (फरदीन खान) यांच्याभोवती फिरताना दिसते. फरदीन हा या तिन्ही जोडप्यांचा कॉमन फ्रेंड असून तो अजूनही बॅचलर आहे. जयपूरमध्ये एका लग्नसमारंभात सगळे मित्र भेटतात आणि खरा खेळ सुरु होतो. या खेळात प्रत्येकाला आपले फोन अनलॉक करून टेबलवर ठेवावे लागतात. या गेमदरम्यान एखाद्याच्या फोनवर मेसेज आला तर तो मेसेज सर्वांसमोर वाचला जातो आणि कॉल आला तर तो फोन लाऊडस्पीकरवर ठेवला जातो व समोरच्याशी संवाद साधला जातो. हळूहळू या जोडप्यांची खेळ खेळत असताना गुपितं बाहेर येतात. खरं हे सर्व पाहताना सर्वजण आनंद घेतात.
संबंधित बातम्या