प्रसिद्ध वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा सीझन १९ बद्दल सतत बातम्या समोर येत आहेत. बिग बॉसचा नवा सीझन सुरू होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण त्याहीपेक्षा नव्या सीझनमध्ये कोणते प्रसिद्ध चेहरे या शोचा भाग असतील याची उत्सुकता आहे. अशातच सलमान खानच्या शोमध्ये सहभागी होण्याबाबत अनेक लोकप्रिय नावेही समोर येत आहेत. दरम्यान, आणखी दोन मोठी नावे समोर येत आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत ते?
शोमध्ये असेल खतरों के खिलाडीचा विजेता
'बिग बॉस १९' आपल्या स्ट्रीमिंगमुळे चर्चेत आला आहे. या शोमध्ये खतरों के खिलाडीच्या विजेत्याच्या एन्ट्रीच्या बातम्या समोर येत आहेत. टेलि चक्करच्या रिपोर्टनुसार, 'खतरों के खिलाडी १३' चा विजेता डिनो जेम्स 'बिग बॉस १९' मध्ये दिसू शकतो. सलमान खानच्या शोसाठी डिनोव्यतिरिक्त अभिनेत्री सुंदस मौफकीरलाही संपर्क साधण्यात आला आहे. मात्र, ममता किंवा निर्मात्यांकडून याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
या स्टार्सच्या नावांचीही सुरु आहे चर्चा
बिग बॉस १९ च्या स्पर्धकांच्या यादीत डिनो जेम्स आणि सुंडस मौफकीर व्यतिरिक्त ममता कुलकर्णी, मुनमुन दत्ता, अपूर्व मखीजा, राज कुंद्रा, राम कपूर, गौतमी कपूर, मुन बॅनर्जी, शशांक व्यास, अरहान अन्सारी, डेझी शाह, खुशी दुबे, नील मोटवानी, शरद मल्होत्रा यांची नावे समोर आली आहेत. हा रिअॅलिटी शो जुलै २०२५ पासून प्रसारित होणार आहे.
संबंधित बातम्या