KGF Chapter 3: ‘केजीएफ ३’मध्ये होणार मोठा धमाका; ‘या’ सुपरस्टारच्या एन्ट्रीमुळे यशच्या चित्रपटाला मिळणार तडका!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KGF Chapter 3: ‘केजीएफ ३’मध्ये होणार मोठा धमाका; ‘या’ सुपरस्टारच्या एन्ट्रीमुळे यशच्या चित्रपटाला मिळणार तडका!

KGF Chapter 3: ‘केजीएफ ३’मध्ये होणार मोठा धमाका; ‘या’ सुपरस्टारच्या एन्ट्रीमुळे यशच्या चित्रपटाला मिळणार तडका!

Published Jul 25, 2024 10:53 AM IST

KGF Chapter 3 Big Update: केजीएफच्या तिसऱ्या भागात यशचा धमाकेदार परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहते पुन्हा एकदा उत्सुक असताना, एक बातमी आली आहे जी त्यांची उत्सुकता आता आणखीनच वाढवणार आहे.

KGF Chapter 3 Big Update
KGF Chapter 3 Big Update

KGF Chapter 3 Big Update: प्रशांत नील हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी या आधी दोन हिट चित्रपट दिले आहेत. 'केजीएफ' आणि 'सालार' हे त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेले चित्रपट आहेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर येताच खळबळ उडवून दिली आहे. चाहते आता 'केजीएफ ३' आणि 'सालार २' च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातील 'केजीएफ ३' संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाच्या सगळ्याच अपडेट्स जाणून घ्यायला चाहते आणि प्रेक्षक नेहमीच आतुर असतात. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते.

‘केजीएफ’ स्टार यश हा साऊथ सिनेमाचा रॉकिंग स्टार मानला जातो. 'केजीएफ' चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे आणि संवादांचे लोकांना अक्षरशः वेड लागले होते. 'केजीएफ' चित्रपटाच्या दुसऱ्या भागात यशच्या डायलॉग्सनी चांगलीच दाणादाण उडवली होती. त्यातील काही संवाद अजूनही लोकांच्या ओठावर आहे. केजीएफच्या तिसऱ्या भागात यशचा धमाकेदार परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहते पुन्हा एकदा उत्सुक असताना, एक बातमी आली आहे जी त्यांची उत्सुकता आता आणखीनच वाढवणार आहे.

होणार ‘या’ सुपरस्टारची एन्ट्री!

अभिनेता अजित कुमार 'केजीएफ ३'मध्ये धमाकेदार एन्ट्री करणार असल्याचे सांगितले जात आहे. असे झाल्यास साऊथ सिनेप्रेमींसाठी हा एक मोठा ट्विस्ट असणार आहे. 'गरुड' आणि 'अधीरा'नंतर केजीएफच्या पुढच्या भागात अजित कुमार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Bigg Boss OTT 3: कठोर कारवाई होणार! अरमान आणि कृतिकाच्या व्हायरल व्हिडीओवर जिओ सिनेमाने सोडले मौन

अजितकुमार यांनी घेतली प्रशांत नीलची भेट!

काही दिवसांपूर्वी अजित कुमारने दिग्दर्शक प्रशांत नील यांची भेट घेतली होती. दोघेही दोन चित्रपटांसाठी एकत्र काम करू शकतात, अशी चर्चा आहे. डीटी नेक्स्टच्या रिपोर्टनुसार, कन्नड आणि तेलगूनंतर प्रशांत नील थेट तामिळमध्ये कथा बनवू शकतात आणि त्यात अजित कुमार मुख्य भूमिकेत असेल. त्यामध्येच हे दोन चित्रपट असू शकतात. यापैकी एक ‘केजीएफ ३’ असेल. तर, दुसरा चित्रपट एखादा नवीन प्रोजेक्ट असू शकतो. या दोन्ही चित्रपटांची निर्मिती होमबेल फिल्म्स अंतर्गत होणार आहे.

सगळं काही ठीक असेल, आणि सगळ्या अटींची पूर्तता झाली तर, यश आणि अजित 'केजीएफ ३'मध्ये स्क्रीन शेअर करू शकतात. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकतो. सध्या प्रशांत नीलकडे 'सालार २' आणि ज्युनियर एनटीआरसोबत एक चित्रपट आहे, ज्याचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही.

Whats_app_banner