Ketaki Chitale : आपल्याला धर्म वाचावायचा आहे! मतदान केल्यानंतर केतकी चितळे काय म्हणाली? व्हिडीओ व्हायरल
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ketaki Chitale : आपल्याला धर्म वाचावायचा आहे! मतदान केल्यानंतर केतकी चितळे काय म्हणाली? व्हिडीओ व्हायरल

Ketaki Chitale : आपल्याला धर्म वाचावायचा आहे! मतदान केल्यानंतर केतकी चितळे काय म्हणाली? व्हिडीओ व्हायरल

Nov 21, 2024 09:06 AM IST

Ketaki ChitaleViral Video : या व्हायरल व्हिडिओत केतकी रिक्षात बसून मतदानानंतर शाई लावलेले बोट दाखवत'ही लढाई हिंदुत्वाची आहे'असे म्हणताना दिसली आहे.

Ketaki Chitale Viral Video
Ketaki Chitale Viral Video

Ketaki ChitaleViral Video :प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे ही नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ती अनेक वादात अडकली होती. तिच्या वक्तव्यांमुळे ती नेहमीच राजकारणाच्या वर्तुळात देखील प्रसिद्धी झोतात असते. आता ती तिच्या एका नव्या व्हिडिओमुळे ती पुन्हा चर्चेत आहे. केतकी चितळेने मतदान केल्यानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती रिक्षात बसून मतदानानंतर शाई लावलेले बोट दाखवत'ही लढाई हिंदुत्वाची आहे'असे म्हणताना दिसली आहे.

केतकी चितळेने या व्हिडिओमध्ये म्हटले की,‘मी माझं मतदान केलं आहे. तुम्ही केलं का?नसेल केलं,तर मतदान जरूर करा. ही लढाई हिंदुत्वाची आहे. आपल्याला धर्म वाचावायचा आहे. जर लव्ह जिहाद होऊ शकतो,लँड जिहाद होऊ शकतो,आणि वोट जिहाद होऊ शकतो,तर आपणंही लढलं पाहिजे. जय भवानी,जय शिवाजी…हर हर महादेव.’तिने या वक्तव्यात स्पष्टपणे सांगितले की,धर्माच्या रक्षणासाठी आपल्याला सक्रिय होऊन मतदान करावे लागेल.

केतकी पुन्हा ट्रोल

केतकी चितळेच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी तिच्या विचारांना पाठिंबा दिला आहे,तर काहींनी तिचा हिंदुत्वाचा मुद्दा उचलून तिच्यावर टीका केली आहे. काही लोकांनी तिच्या व्हिडिओवर लोकशाही वाचवण्याचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे. अनेकांनी तिच्या वक्तव्याला विरोध करत तिला लोकशाहीचे महत्त्व लक्षात आणून दिले आहे.

महाविकास आघाडीच्या काळात केतकी चितळे सोशल मीडियावर एक पक्षाच्या बाजूने उभं राहिल्याचे दिसून आले होते. तिच्या काही पोस्टमुळे ती वादात अडकली होती आणि त्यावर आक्षेप घेतला गेला होता. केतकीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आपले मत व्यक्त केले होते,ज्यामुळे ती चर्चेत आली होती. आता मतदानासंबंधी केलेल्या या व्हिडिओने पुन्हा एकदा तिला चर्चेच्या केंद्रस्थानी आणले आहे.

व्हिडिओतून केले होते मतदानाचे आवाहन

केतकी चितळेने या व्हिडिओमधून जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले होते. ती म्हणाली आहे की,मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि त्याचा उपयोग करून देशातील भविष्यात महत्त्वपूर्ण बदल करता येऊ शकतात. तिने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विचार मांडताना,सामाजिक समस्यांचा संदर्भ घेत भारताच्या भविष्याची दिशा ठरविण्याचे महत्त्व सांगितले आहे.

केतकीच्या या व्हिडिओला अनेक लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी, तिच्या विचारांवर टीका करणारे लोक देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की,या प्रकारे केलेले वक्तव्य समाजात तणाव निर्माण करू शकते आणि त्यामुळे समाजात एकतेला धक्का पोहोचू शकतो. केतकी चितळेचा हा व्हिडिओ आणि तिचे वक्तव्य लोकांमध्ये कोणती चर्चा घडवून आणते, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. त्यावर तिला काय प्रतिसाद मिळतो आणि तिच्या आगामी सामाजिक किंवा राजकीय भूमिकेवर त्याचा कसा परिणाम होतो,हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Whats_app_banner