Ketaki Chitale Trolled By Netizens: मराठी अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. केतकी चितळे नेहमीच बोल्ड आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनाची मोठी हवा होती. याच दरम्यान सरकारच्यावतीने सध्या जातगणना केली जात आहे. या सर्वेक्षणासाठी काही बीएमसी कर्मचारी प्रत्येक घरोघरी जाऊन काही प्रश्नोत्तर करत आहेत. यावेळी काही कर्मचारी केतकी चितळे राहत असलेल्या सोसायटीमध्ये देखील गेले होते. त्यावेळी केतकी चितळे हिने या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांचा एक व्हिडीओ बनवला. तिचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेत आला असून, या व्हिडीओमुळे ती ट्रोल होत आहे.
केतकी चितळेच्या या व्हिडीओनंतर आता नेटकरी तिला चांगलंच ट्रोल करत आहेत. तिच्या या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. नेटकरी देखील आता तिला जोरदार ट्रोल करत आहेत. केतकी चितळेच्या या व्हिडीओवर एकाने लिहिले की, ‘ताई आरक्षणाचा मुद्दा आहे हा. कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही आहे. फक्त मराठा यांना आरक्षण देण्यासाठी सर्वे चालू आहे. संविधानानुसार जातीच्या आधारावर भेदभाव करणे गुन्हा आहे मान्य पण जर सर्वे केला नाही तर किती टक्के मराठा आज महाराष्ट्रात आहेत आणि किती टक्के मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे हे कळणार नाही. यात कुठलाही भेदभाव केला जात नाहीये.’
दुसऱ्याने लिहिले की, ‘तुम्ही पण मराठा आहेत का ? असे विचारले तर जितक्या झटकन "अजिबात नाही "म्हणून "ब्राह्मण' आहे असं सांगितलं, यावरून कळते की तुमचा मराठा जातीबद्दल किती द्वेष आहे व स्वतःच्या जातीचा किती अभिमान आहे... तुम्हाला एवढा स्वतःचा जातीचा अभिमान आहे, तर मग इतरांना का असू नये???’ आणखी एका व्यक्तीने लिहिले की, ‘अर्धज्ञानी असल्याची लक्षणे... जात बघून कोण ऍक्ट्रॉसिटी लावतं ताई.. अभ्यास अपूर्ण झालाय वाटतं ताईचा..’
केतकी चितळे आता सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी तिला आता चांगलंच फैलावर घेतलं आहे. प्रजासत्ताक दिनी केतकी चितळेने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती एका महिला कर्मचाऱ्याला प्रश्न विचारताना दिसली होती. ‘तुम्ही महापालिकेतून आल्या आहात ना? तुम्ही सर्वांना जात विचारताय, रिझर्व्ह की ओपन म्हणून... का?’, असा प्रश्न केतकीने विचारला. त्यावर या कर्मचारी महिलेने मराठा आरक्षणासाठी हा सर्व्हे सुरू असल्याचे म्हटले होते. यानंतर केतकी चितळे हिने त्या महिल्या कर्मचारीशी बराच वेळ हुज्जत घातली होती.
संबंधित बातम्या