मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतच्या सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत. आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना मराठी अभिनेत्री केतकी चितळेने थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तिने मनोज जरांगे यांचे जुने वक्तव्य पोस्ट करत सनातनींमध्ये फूट पाडायची आहे असे म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी एका भाषणामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी धनगर आणि मुस्लीम समाजाचा उल्लेख केला होता. त्यावेळी ते “धनगर आणि मुस्लीम बांधवांनी मागणी केल्यास त्यांच्याही आरक्षणासाठी मी लढा देईल. मग बघतो सरकार कसे आरक्षण देत नाही त्यांना” असे म्हणाले होते. केतकीने मनोज जरांगे पाटील यांचे हे वक्तव्य शेअर करत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
वाचा:'फायटर'ला लागले ग्रहण! कमाईत ५० टक्के घसरण
केतकीने मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्याचा फोटो शेअर करून लिहिल आहे, “आता कसे, खरे रूप दिसले. मुखवटा फार काळ टिकत नाही. यांना फूट पाडायची आहे सनातनींमध्ये. आता तरी जागे व्हा.” केतकीची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.
केतकी ही सध्या मनोरंजन विश्वापासून दूर आहे. तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आंबट गोड’, झी मराठीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. या मालिकांनी तिला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले. त्यानंतर तिने सोनी टीव्हीवरील ‘सास बिना सुसराल’ या हिंदी मालिकेतही काम केले आहे. केतकी ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तिच्या पोस्ट सतत सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात.
संबंधित बातम्या