मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी,' केतकी चितळेची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

'हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी,' केतकी चितळेची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 11, 2024 07:24 AM IST

अभिनेत्री केतकी चितळे ही कायमच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने नुकत्याच केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Ketaki Chitale
Ketaki Chitale

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांचा शपथविधी सोहळा दिल्लीमध्ये पार पडल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान, मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कायमच वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाणरी केतकी ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या पोस्टमुळे ती तुरुंगात जावे लागले होते. पण तरीही ती तिची स्पष्ट मतं सोशल मीडियावर कायमच मांडत असते. सध्या केतकीने केलेली नवी पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
वाचा : किडनॅप झालेले अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे सापडले! कुठे आणि कसे जाणून घ्या सविस्तर

काय आहे केतकीची पोस्ट?

अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर तिने'हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी' असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर केतकीची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. अनेकांनी त्याच्यावर कमेंट केल्या आहेत.
वाचा : बॉलिवूड अभिनेत्रीने संपवले स्वत:चे आयुष्य, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

कश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यावरही केतकीची पोस्ट

केतकीने काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरही पोस्ट केली आहे. 'काल वैष्णव देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या गाडीवर हल्ला झाला. कुठे आहे ऑल आईज ऑन रफाह वाले लोक? हिंदू राष्ट्राची आमची मागणी पूर्ण करा' असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
वाचा : सावनीशी लग्न न करण्यासाठी हर्षवर्धनने आखला नवा प्लान, काय असेल मिहिर आणि मुक्ताची प्रतिक्रिया?

९ जूनला पार पडला शपथ विधी

एनडीए सरकारने बहुमत मिळवत तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जून २०२४ रोजी तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला जगभरातील दिग्गज लोकांनी हजेरी लावली. तसेच अनेकांनी मोंदीना शुभेच्छा दिल्या. पण याच दरम्यान, कश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यावरुन अनेकांनी मोदींना सुनावले आहे. याच सगळ्यावर केतकी चितळेने पोस्ट केली आहे.
वाचा : आई-वडिलांना मदत करण्यासाठी कलाने शोधली नवी नोकरी, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत नवे वळण

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग