Ketaki Chitale Viral Video On Atrocity: मराठी मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत असते. केतकी चितळे आणि वाद हे समीकरण तसं नवीन नाही. सतत काहीना काही वादग्रस्त विधानं करून ती प्रसिद्धी झोतात येत असते. आता देखील केतकी चितळे हिने असंच काहीसं केलं आहे. यामुळे आता केतकी चितळे पुन्हा अडचणीत सापडली आहे. आता केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. नुकतीच केतकी चितळे परळी येथे पार पडलेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेत सामील झाली होती. यावेळी मंचावरून भाषण करत असताना, केतकी चितळे हिने ॲट्रॉसिटी कायद्याविरोधात वक्तव्य केली आहेत. यामुळेच आता पुन्हा एकदा केतकी चितळे वादात अडकली आहे.
नुकतेच बीड परळीत ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत अभिनेत्री केतकी चितळे देखील सहभागी झाली होती. यावेळी तिने मंचावरून भाषण देखील केले. मात्र, हे भाषण करत असताना तिने ॲट्रॉसिटी कायद्याविषयी काही वादग्रस्त वक्तव्य केली. या परिषदेतील तिच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे आता केतकी चितळे हिच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. केतकीच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे दलित आणि मराठा समाजाच्या भावना दुखावल्याचे म्हणत, तिच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी परळी बीडमधील दलित आणि मराठा बांधव करत आहेत.
केतकी चितळेने ब्राह्मण ऐक्य परिषदेत बोलताना म्हटलं की, ॲट्रॉसिटी करणाऱ्या लोकांचे रॅकेट सध्या सगळीकडे सुरू आहे. काही लोक ॲट्रॉसिटी कायद्याचे रॅकेट चालवत असून, यासंदर्भात आरटीआय टाका आणि गेल्या ५ वर्षांची माहिती मिळवा, असे आवाहन तिने या मंचावरून केले होते. यावेळी बोलताना केतकी चितळे म्हणाली की, ‘असे अनेक वकील आहेत, त्यातल्या एकाचं उदाहरण सांगते. त्यांनी गेल्या १५ ते २० वर्षांत तब्बल ६२ ॲट्रॉसिटीच्या केसेस टाकल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी त्याचा व्हीटनेस एकच असतो. आता नुकतीच त्याने एका टीसीवर एक केस दाखल केली आहे. का तर तिकीट नाही आणि टीसीने पकडलं म्हणून.. दंड भरण्याऐवजी या व्यक्तीने ॲट्रॉसिटी केस केली. आता बिचाऱ्या त्या टीसीला सतत कोर्टात जावं लागत आहे. हे यांचं रॅकेट आहे.’
केतकीच्या याच वक्तव्यानंतर आता तिच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.
संबंधित बातम्या