दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार अभिनेत्री म्हणून किर्ती सुरेश ओळखली जाते. तिने अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. किर्तीचे आज लाखो चाहते आहेत. तिच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी ते सर्वजण आतुर असतात. किर्ती लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. पण किर्ती कोणाशी लग्न करणार? कधी लग्न करणार असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. चला जाणून घेऊया किर्तीच्या लग्नाविषयी...
समोर आलेल्या माहितीनुसार, किर्ती बॉयफ्रेंड अँटोनी थाटीलसोबत विवाह करणार आहे. गेली अनेक वर्षे ते एकमेकांना डेट करत आहेत. आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णला कुटुंबीयांनी संमती दिली असल्याची माहिती समोर आली आहे. किर्ती आणि अँटोनी हे डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. पण त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
किर्ती सुरेश नुकतेच तिच्या कुटुंबीयांसोबत आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिरात दर्शनासाठी गेली होती. यावेळी पापाराजींच्या काही प्रश्नांची तिने उत्तरं दिली. यावेळी किर्ती सुरेशने ती लाँग टाईम बॉयफ्रेंड अँटोनीसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले आहे. डिसेंबर २०२४मध्ये लग्न करणार आहे. तसेच ते डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. त्यासाठी त्यांनी गोवा हे ठिकाण निवडले आहे.
किर्ती सुरेश लग्न करत असल्याचे ऐकून सर्वांना आनंद झाला आहे. लग्नाबाबत बोलताना किर्ती म्हणाली की, “आगामी महिन्यात माझं लग्न आहे. त्यासाठी मी श्रीवरू यांच्या दर्शनाला आली आहे. आमचं लग्न गोव्याला होणार आहे." डिसेंबर महिन्यात ११ किंवा १२ तारखेला किर्ती लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. जवळचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत हा विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा: पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्या 'चिमणी पाखरं'मधील अंजू आठवतेय का? वाचा सध्या काय करते
किर्तीने नोव्हेंबर महिन्यामध्ये बॉयफ्रेंड अँटोनीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोची बरीच चर्चा रंगली होती. हा फोटो शेअर करत तिने, '१५ वर्षे झाली. आजही मी दिवस मोजत आहे. ही दिवसांची मोजणी भविष्यातही सुरु असेल' असे कॅप्शन दिले. नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा भडीमार केला होता.
संबंधित बातम्या