बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला रिअॅलिटी टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती' कायमच चर्चेत असतो. या शोमध्ये एखादा स्पर्धक हा ७ कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहोचतो. आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा साहसाने भरलेला तो क्षण अनुभवण्याची संधी मिळणार आहे. कारण यावेळी दोन स्पर्धक हे सात कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचले आहेत. आता हे स्पर्धक या प्रश्नाचे योग्य उत्तर देणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘कौन बनेगा करोडपती’चा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दोन स्पर्धक हॉट सीटवर बसलेले दिसत असून अप्रतिम खेळत आहेत. या दोनही स्पर्धकांनी हॉट सीटवर बसून ७ कोटी रुपयांचा पल्ला गाठवला आहे. पण प्रश्न असा आहे की, शेवटच्या प्रश्नाचे उत्तर देऊन ते हा खेळ संपवू शकतील का? येत्या काळात प्रेक्षकांना तेही कळेल.
नव्या प्रोमो व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर दोन तरुण मुलं बसलेली दिसत आहेत. ही दोन्ही मुले एकत्र नव्हे तर स्वतंत्रपणे खेळणार आहेत. कोणत्या खेळाडूला पहिल्यांदा हॉटसीटवर बसण्याची संधी मिळणार हे काळानुसार कळेल. प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की २३, २४ आणि २५ तारखेचा एपिसोड चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. प्रोमो व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन म्हणाले की, तयार व्हा कारण या तीन दिवसांत इतिहास रचला जाणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू एकाच वंशातील आहेत.
जे हॉटसीटवर अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसून करोडपती बनतील आणि मग ७ कोटींच्या प्रश्नाला सामोरे जातील, त्यांची नावे उज्ज्वल प्रजापती, चंद्र प्रकाश आहेत. ही दोन तरुण मुलं ७ कोटींच्या प्रश्नापर्यंत कशी जातील आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील का? असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे चाहत्यांना अद्याप मिळालेली नाहीत. प्रोमो व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये निर्मात्यांनी लिहिले की 'कोट्यवधी प्रश्नांसह केबीसीमध्ये इतिहास रचला जाईल.'
वाचा: २९ चित्रपटांना मागे टाकत ऑस्कर नॉमिनेशमध्ये जागा मिळवणाऱ्या 'लापता लेडीज' सिनेमाची कथा आहे तरी काय?
केबीसीने शेअर केलेल्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या आहेत. एका यूजरने 'माझ्या भावाचे खूप खूप अभिनंदन' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'प्रोमो पाहून अंगावर काटा आला' अशी कमेंट केली आहे. कौन बनेगा करोडपतीचा हा सीझन अनेक नवीन गोष्टी घेऊन आला आहे. शोमध्ये डबल ही संकल्पना एकदम नवीन आहे आणि यामाध्यमातून खेळाडू जेव्हा हवं तेव्हा एका झटक्यात आपले पैसे दुप्पट करू शकतो. याशिवाय केबीसीमध्ये काही नवीन गोष्टी आणल्या आहेत, ज्याचा चाहते खूप आनंद घेत आहेत.