KBC 16 Abhishek Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती १६’ अर्थात केबीसी १६ होस्ट करत आहेत. या शोच्या आगी भागात शूजित सरकार आणि अभिषेक बच्चन शोमध्ये येणार आहेत. सोनी टीव्हीने केबीसीचा नवा प्रोमो जारी केला आहे, ज्यात अभिषेक बच्चनने त्याचे वडील अमिताभ यांच्या सात कोटी रक्कम सांगण्याच्या स्टाईलची पुनरावृत्ती केली आहे. अभिषेक बच्चनला नक्कल करताना पाहून अमिताभ बच्चनही आपलं हसू रोखू शकले नाहीत. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
अभिषेक बच्चन म्हणतो, ‘भोपू वाजू नये, आणि आम्हाला आणखी वेळ मिळावा. आम्ही सात लाख जिंकावेत. आमच्या घरात जेव्हा सगळे एकत्र जेवण करतात आणि त्या दरम्यान कोणी प्रश्न विचारला तर सगळी मुलं मिळून बोलू लागतात 'सात कोटी.' अभिषेक बच्चन जेव्हा हे सांगत होता, तेव्हा अमिताभ आणि सेटवर उपस्थित बाकीचे प्रेक्षक खूप हसत होते. अभिषेक म्हणतो की जोपर्यंत आम्ही सात कोटी जिंकत नाही, तोपर्यंत प्रेक्षक म्हणतात की, आम्ही जाणार नाही. यानंतर अमिताभ बच्चन हसत म्हणतात की, याला इथे बोलावून मोठी चूक केली. हे ऐकून अभिषेक पुन्हा एकदा ७ कोटी ओरडतो.यावेळी अमिताभसोबत बसलेले प्रेक्षकही हसतात. अभिषेकसोबत 'आय वॉन्ट टू टॉक' दिग्दर्शक शूजित सरकारही प्रोमोमध्ये दिसत आहे.
अभिषेकच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर आता त्याचा आय वॉन्ट टू टॉक हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आधुनिक काळातील गुंतागुंतीच्या नात्याविषयी या चित्रपटात सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून त्याला चांगलीच पसंती मिळाली आहे. या चित्रपटात अभिषेकसोबत जॉनी लिव्हर, जयंत कृपलानी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.
शूजित पहिल्यांदाच अभिषेकसोबत काम करत आहे. मात्र, त्यांनी अमिताभ बच्चनसोबत चार वेळा काम केले आहे. दोघांनी 'शूबाईट', 'पिकू', 'पिंक' आणि 'गुलाबो सीताबो'मध्ये एकत्र काम केले आहे. आता ते अभिषेक बच्चनसोबत एक चित्रपट घेऊन येत आहे, ज्याचे नाव आहे 'आय वॉन्ट टू टॉक'. यात जॉनी लीव्हर आणि अहिल्या बामरू यांच्याही भूमिका आहेत. रायझिंग सन फिल्म्स आणि किनो वर्क्स निर्मित, हा चित्रपट एका गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या माणसाची कथा सांगतो, ज्याला एक मुलगी आहे आणि तो तिच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. या आजारी व्यक्तीच्या भूमिकेत अभिषेक आहे. तो सिंगल वडिलांची भूमिका साकारत आहे.