KBC 16 Latest Update: 'कौन बनेगा करोडपती १६'च्या कालच्या भागाची सुरुवात अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल बोलत केली. या दोन्हीही महान व्यक्तीमत्त्वांची २ ऑक्टोबर रोजी जयंती होती. यानंतर गुजरातमधून आलेला स्पर्धक भौतिक हॉटसीटवर विराजमान झाला. भौतिकने ६ प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन ६० हजार रुपये जिंकले. नंतर त्याने प्रेक्षक पोल लाइफलाइनला पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला. पण, या संपूर्ण खेळात त्याला त्याची एक चूक महागात पडली आणि त्यामुळे तो २५ लाखांऐवजी केवळ ३ लाख २० हजार रुपये जिंकू शकला.
भौतिकने ६ लाख ४० हजार आणि १२ लाख ५० हजार या दोन्ही प्रश्नांसाठी दोन लाईफलाईन वापरल्या. या लाईफलाईनच्या मदतीने त्याने १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. मात्र, २५ लाखांच्या रकमेसाठी त्याला प्रश्न विचारला गेल्यावर, तो थोडा गोंधळून गेला. भौतिकला या प्रश्नाचे योग्य उत्तर माहित नव्हते. इतकंच नाही तर, यावेळी त्याच्याकडे कोणतीही लाईफलाईन शिल्लक नव्हती. मात्र, तरीही त्याने उत्तर देण्याचा धोका पत्करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याने चुकीचे उत्तर दिले आणि परिणामी जिंकलेली रक्कमही त्याला गमवावी लागली. अमिताभ यांनी भौतिकला २५ लाख रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहीत आहे का? काय होता हा प्रश्न बघा...
या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्याला ४ पर्याय देण्यात आले होते. त्यापैकी भौतिक डी) बृहस्पति निवडला. मात्र, या प्रश्नाचे बरोबर उत्तर बी) बुध होते. या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्याने भौतिकने १२ लाख ५० हजार रुपये गमावत केवळ ३ लाख २० हजार रुपये जिंकत हा खेळ सोडला.
‘केबीसी’च्या मंचावर अमिताभ बच्चन नेहमीचा आपले किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यावेळी त्यांनी मंचावर आपली अधुरी राहिलेली इच्छा बोलून दाखवली. ‘बिग बी’ म्हणाले की, मला लष्करात जाण्याची खूप इच्छा आहे. मला लष्कराच्या गणवेशाचे खूप आकर्षण आहे. एखादी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी का असेना, जेव्हा मी हा गणवेश घालतो, तेव्हा मला स्वतःमध्ये बदल जाणवतो. मी माझे काम जबाबदारीने करू लागतो, शिस्तीची काळजी घेतली जाते.’ अमिताभ बच्चन पुढे म्हणाले की, ‘एखाद्या व्यक्तीला सैन्यात भरती झाल्यानंतरच संयमाचा खरा अर्थ कळतो. सैन्यात भरती होण्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. भविष्यात मला कधी संधी मिळाली, तर मला नक्कीच स्वेच्छेने आणि मोठ्या आनंदाने सैन्यात सामील व्हायला आवडेल.’