KBC 16 : युपीएससीची तयारी करणाऱ्या निशांतने झटक्यात दिलं २५ लाखांच्या प्रश्नाचं उत्तर! तुम्हाला माहितीय का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC 16 : युपीएससीची तयारी करणाऱ्या निशांतने झटक्यात दिलं २५ लाखांच्या प्रश्नाचं उत्तर! तुम्हाला माहितीय का?

KBC 16 : युपीएससीची तयारी करणाऱ्या निशांतने झटक्यात दिलं २५ लाखांच्या प्रश्नाचं उत्तर! तुम्हाला माहितीय का?

Nov 19, 2024 04:41 PM IST

KBC 16 Latest Question for 25 Lacs : छत्तीसगडच्या निशांतने आपली बुद्धीमत्ता दाखवून चांलाग खेळ खेळला. एका अतिशय अवघड प्रश्नाचे उत्तर देऊन त्याने२५लाख रुपये जिंकले.

KBC 16 Latest Question for 25 Lacs
KBC 16 Latest Question for 25 Lacs

KBC 16 Latest Question for 25 Lacs : ‘कौन बनेगा करोडपती १६’ हा शो सध्या टेलिव्हिजन विश्वात चर्चेत आहे. या शोला टीव्हीवर २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. कालच्या एपिसोडमध्ये, रायगड, छत्तीसगड येथील निशांत जैस्वाल हा स्पर्धक हॉट सीटवर बसला. त्याने आपल्या ज्ञानाचे अप्रतिम प्रदर्शन केले आणि चांगला खेळ दाखवला. कालच्या भागात २ लाईफलाईन्सच्या मदतीने २५ लाख रुपये जिंकले. पण, आता ५० लाखांसाठी त्याच्यासमोर कोणता प्रश्न उभा राहणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, प्रश्न विचारण्याआधीच वेळ संपली आणि बझर वाजला. निशांतने २५ लाख जिंकले त्या प्रश्नाचे उत्तर देऊन जाणून घेऊया.

‘या’ कठीण प्रश्नाचे उत्तर देऊन जिंकले २५ लाख

छत्तीसगडच्या निशांतने आपली बुद्धीमत्ता दाखवून चांगला खेळ खेळला. एका अतिशय अवघड प्रश्नाचे उत्तर देऊन त्याने २५ लाख रुपये जिंकले. तो प्रश्न  काय होता आणि त्याचे योग्य उत्तर काय होते, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या प्रश्नाचं उत्तर ज्यांना माहिती नाही, त्यांच्या ज्ञानातही नक्कीच भर पडेल.

प्रश्न: शूरसेना महाजनपदाची राजधानी यापैकी कोणती शहरे होती?

पर्याय

ए. मथुरा

बी. तक्षशिला

सी. विराट नगर

डी. श्रावस्ती

उत्तर : प्रश्न जरा अवघड असला तरी निशांतची बुद्धी अतिशय तल्लख होती. त्याने कोणत्याही लाईफलाईनची मदत न घेता लगेच प्रतिसाद दिला. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय ए. मथुरा आहे.

KBC 16 Junior : दहावीत शिकणाऱ्या आर्यनने जिंकले ५० लाख; इतिहासाच्या ‘या’ प्रश्नावर अडकली गाडी! तुम्हाला माहितीये उत्तर?

आईच्या अंगठ्या गहाण ठेवून केला अभ्यास!

निशांत सध्या युपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. निशांत या परीक्षेची तयारी करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. निशांत म्हणतो की, त्याला आयुष्यात खूप पुढे जायचे आहे आणि कोणतीही प्रतिकूल परिस्थितीत त्याला थांबवू शकत नाही. असेच काहीसे निशांतच्या बाबतीत आजवर घडले आहे. त्याचे आई-वडील अशिक्षित होते, पण त्यांना शिक्षणाचे महत्त्व माहित होते. निशांत आपल्या आई-वडिलांच्या कष्टाबद्दल सांगताना म्हणाला की, त्यांनी मला शिकवले आणि माझ्या आईच्या कानातले गहाण ठेवून पुढील शिक्षण घेण्यासाठी पैसे दिले.

निशांत करतोय युपीएससीची तयारी

निशांत हा सरकारी नोकरी करणारा त्याच्या कुटुंबातील पहिला मुलगा आहे. यासोबतच तो यूपीएससीचीही तयारी करत आहे. त्याला आपल्या कुटुंबाला वैभव मिळवून द्यायचे आहे. आपला मुलगा खूप चांगला आणि हुशार असल्याचं त्याच्या आईने कौतुकाने सांगितलं. सेटवर निशांतच्या लग्नाचीही चर्चा सुरू होती. यावेळी त्याच्या आईने सांगितले की, त्यांचा मुलगा आपल्या आवडीच्या मुलीशीच लग्न करेल.

Whats_app_banner