KBC 16 Latest Episode : लहान असो वा मोठे, अगदी आबालवृद्ध प्रेक्षकांना महानायक अमिताभ बच्चन यांचा शो 'कौन बनेगा करोडपती १६' पाहायला आवडतो. या शोची स्वतःची अशी एक ओळख आहे. या शोमधून अनेक प्रकारची माहिती प्रेक्षकांना मिळते. केबीसीच्या प्रत्येक सीझनमध्ये असे अनेक स्पर्धक आले आहेत, ज्यांच्या आयुष्याच्या कथा इतक्या प्रेरणादायी आहेत की, त्या अनेक लोकांसाठी प्रेरणा बनल्या आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये हर्षा उपाध्याय नावाची स्पर्धक आल्या होत्या, ज्यांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर भरपूर पैसे जिंकले.
यासोबतच त्यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षमय प्रवासही लोकांसोबत शेअर केला. त्या आपल्या बुद्धीच्या बळावर प्रश्नांची उत्तरे देत होत्या. मात्र, २५ लाख रुपयांच्या प्रश्नावर त्या अडकल्या आणि त्यांना खेळ सोडावा लागला. हर्षा उपाध्याय ज्या प्रश्नावर अडकल्या होती, त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का? हिंदुत्वाशी संबंधित हा प्रश्न काय होता, ते जाणून घेऊया...
‘केबीसी १६’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी हर्षा यांना विचारलेला प्रश्न जरा अवघडच होता. त्यावेळी हर्षा यांच्याकडे २ लाईफलाईन्स ‘डबल डिप’ आणि ‘व्हिडीओ कॉल अ फ्रेंड’ शिल्लक होत्या. यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉल अ फ्रेंड ही लाईफलाईन घेतली, पण तीही उपयोगी ठरू शकली नाही. त्यांच्याकडे ‘डबल डीप’ ही लाईफलाईन शिल्लक होती. मात्र, त्यांनी समजूतदारपणा दाखवत खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. हा प्रश्न हिंदुत्वावर आधारित होता. जाणून घ्या हा प्रश्न काय होता...
पर्याय:
ए. पुष्करद्वीप
बी. कुशद्वीप
सी. क्रौंचद्वीप
डी. इक्षुरसद्वीप
हर्षा यांनी त्यांच्या मैत्रिणीला प्रश्नाचे उत्तर द्यायला सांगितले. पण, मैत्रिणही उत्तर देऊ शकली नाही. त्या गोंधळून गेल्या होत्या. मात्र, हर्षा शांत राहिल्या. कारण प्रश्न देतानाच सगळा वेळ निघून गेला. मात्र, नंतर त्यांनी त्या प्रश्नाचे जे अंदाजे उत्तर दिले, ते चुकीचे निघाले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 'डी' म्हणजेच इक्षुरसद्वीप आहे.
‘केबीसी १६’च्या शोच्या सुरुवातीला हर्षाने स्वतःबद्दल खूप काही गोष्टी सांगितल्या. हर्षा या पायाने अपंग आहेत. त्यांच्या पायात काही समस्या आहेत, ज्यामुळे त्यांना चालणे देखील कठीण झाले आहे. त्यांचा एक पाय इतका जड आहे की, दोन लोक मिळूनही त्यांना उचलू शकत नाहीत. अशा परिस्थितीत जेव्हा लोक त्यांना नावं ठेवत होते, तेव्हा त्यांची बहीण त्यांचा आधार बनली. त्यांच्या बहिणीने आपले सर्व सुख सोडून दिले आणि लग्नही केले नाही. आता दोघी बहिणी मिळून जगभ्रमंती करण्याचं स्वप्न बघत आहेत.
संबंधित बातम्या