KBC 16 Junior : दहावीत शिकणाऱ्या आर्यनने जिंकले ५० लाख; इतिहासाच्या ‘या’ प्रश्नावर अडकली गाडी! तुम्हाला माहितीये उत्तर?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC 16 Junior : दहावीत शिकणाऱ्या आर्यनने जिंकले ५० लाख; इतिहासाच्या ‘या’ प्रश्नावर अडकली गाडी! तुम्हाला माहितीये उत्तर?

KBC 16 Junior : दहावीत शिकणाऱ्या आर्यनने जिंकले ५० लाख; इतिहासाच्या ‘या’ प्रश्नावर अडकली गाडी! तुम्हाला माहितीये उत्तर?

Nov 16, 2024 11:21 AM IST

KBC 16 Junior Latest Episode : आर्यन हा ‘केबीसी १६ ज्युनियर’चा पहिला स्पर्धक आहे, ज्याने १ कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंतचा पल्ला गाठला आहे.

KBC 16 Junior Latest Episode
KBC 16 Junior Latest Episode

KBC 16 Junior Latest Episode : ‘कौन बनेगा करोडपती १६’मध्ये ज्युनियर सीझन सुरू झाला आहे. यामध्ये सहभागी होऊन पंजाब आर्यन हांडा याने केवळ आपल्या ज्ञानाचे प्रदर्शनच केले नाही, तर आर्यन हा दहावीचा विद्यार्थी असून तो किती हुशार आहे, हे दाखवून दिले. त्याने समोर आलेल्या सगळ्या प्रश्नांची धडधड उत्तरे दिली. मात्र, एका इतिहासाशी संबंधित प्रश्नावर त्याची गाडी अडकली. या प्रश्नाचे उत्तर न देऊ शकल्यामुळे तो १ कोटी रुपये जिंकू शकला नाही.

‘या’ प्रश्नाचे उत्तर देऊन आर्यनने जिंकले ५० लाख

आर्यनने खूप चांगला खेळ खेळला आणि ५० लाख रुपये जिंकून घरी गेला. तो प्रश्न कोणता होता, ज्याचे उत्तर देऊन तो ‘केबीसी १६ ज्युनियर’चा ५० लाख रुपये जिंकणारा पहिला स्पर्धक ठरला आहे. पाहा प्रश्न

प्रश्न: १९व्या शतकात राजा व्हिक्टर इमॅन्युएल दुसरा याच्या राजवटीत यापैकी कोणते ठिकाण एकत्र केले गेले?

A. इंग्लंड

B. पोर्तुगाल

C. इटली

D. फ्रान्स

उत्तरः आर्यनने कोणत्याही लाईफलाईनची मदत न घेता या प्रश्नाचे उत्तर अगदी सहज दिले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय C. इटली.

‘या’ प्रश्नावर अडकली आर्यनची गाडी

आर्यन हा ‘केबीसी १६ ज्युनियर’चा पहिला स्पर्धक आहे, ज्याने १ कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंतचा पल्ला गाठला आहे. त्याने ५० लाख रुपये जिंकले, पण १ कोटी रुपयांच्या प्रश्नावर तो अडकला. इतिहासाशी संबंधित या प्रश्नाचे उत्तर माहित आहे का?

KBC 16 : याला केबीसीच्या मंचावर बोलावून चूक केली! अभिषेक बच्चन जे काही बोलला, त्यामुळं वैतागले अमिताभ

प्रश्न: ज्या लाघुग्रहामुळे डायनासोर मारले गेले असे मानले जाते, त्याने तयार केलेले विवर सापडले तेव्हा पेनफिल्ड आणि कॅमर्गो-झानोगुएरा काय करत होते?

पर्याय:

A. हिऱ्यांची खाण

B. कालव्यासाठी सर्वेक्षण

C. प्राचीन अवशेषांचा अभ्यास

D. तेलाचा शोध

उत्तरः आर्यनला या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड गेले आणि त्याने खेळ सोडला. त्याला या प्रश्नाचे अंदाजे उत्तर विचारले असता त्याने पर्याय C. प्राचीन अवशेषांचा अभ्यास निवडला. मात्र, हे चुकीचे होते आणि योग्य उत्तर पर्याय D. तेलाचा शोध आहे.

आर्यनचे स्वप्न इस्रोमध्ये जायचे!

आर्यनने शोमध्ये सांगितले की, जेव्हा चांद्रयान ३ची बातमी आली, तेव्हा याबद्दल जाणून घेण्याची त्याची उत्सुकता वाढली. चंद्र, ग्रह, आकाशगंगा आणि ताऱ्यांबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा आहे आणि तो गुगलवर सतत संशोधन करत असतो, असं त्याने सांगितलं. या खेळात दमकदार कामगिरी दाखवून त्याने ५० लाख रुपये जिंकले. बिग बींनी आर्यनच्या खेळातील त्याच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले आणि म्हटले की, भारताचे भविष्य चांगल्या हातात आहे. आर्यनने प्रश्नांची उत्तरे देऊन सर्व मोठ्या बक्षिसांची रक्कम तर जिंकलीच, पण ४५ मिनिटांत ३ रुबिक्स क्यूब्स सोडवून सर्वांना चकित केले.

Whats_app_banner