KBC 16 : अभ्यासात अगदीच सरासरी होते अमिताभ बच्चन! बीएससीमध्ये किती मार्क्स मिळालेले माहितीये का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC 16 : अभ्यासात अगदीच सरासरी होते अमिताभ बच्चन! बीएससीमध्ये किती मार्क्स मिळालेले माहितीये का?

KBC 16 : अभ्यासात अगदीच सरासरी होते अमिताभ बच्चन! बीएससीमध्ये किती मार्क्स मिळालेले माहितीये का?

Oct 01, 2024 08:40 AM IST

KBC 16 : 'कौन बनेगा करोडपती १६'च्या सेटवर अमिताभ बच्चन यांनी आपण विद्यार्थी म्हणून कसे होतो याबद्दल किस्सा सांगितला. सायन्समध्ये चांगले मार्क मिळाले म्हणून B.Sc केल्याचे त्यांनी सांगितले.

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवले असले, तरी अभ्यासात ते अगदीच सरासरी होते. खुद्द अमिताभ यांनी 'कौन बनेगा करोडपती १६'च्या सेटवर ही माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन केबीसीच्या सेटवर नेहमीच आपल्या आयुष्यातील काही खास आणि भन्नाट किस्से शेअर करत असतात. यावेळी अमिताभ यांनी हॉट सीटवर बसलेल्या कीर्तीला सांगितले की, त्यांना बारावीत सायन्समध्ये खूप चांगले मार्क्स मिळाले होते, म्हणून त्यांनी सायन्सला प्रवेश घेतला, पण कॉलेजमध्ये हा विषय त्यांना कधीच समजला नाही.  

कौन बनेगा करोडपती सीझन १६’च्या नव्या भागामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोर स्पर्धक कीर्ती बसली होती. तिला ५००० रुपयांसाठी गणिताशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. कीर्तीने बरोबर उत्तर दिल्यावर बिग बी म्हणाले, ‘देवीजी बँकेत काम करतात आणि अशा लोकांना गणितात अव्वल असावे लागते. म्हणूनच त्यांनी पटकन उत्तर दिले.' तेव्हा कीर्तीने म्हटले की, तिला गणित या विषयात ४० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले नाहीत. त्यानंतर त्यांच्या बीएससी मार्कशीटबद्दल सांगितले.

Rajinikanth Health : रजनीकांत यांना अचानक रुग्णालयात का दाखल करावे लागले? पत्नीने दिली हेल्थ अपडेट

'४५ मिनिटांनंतर आमचं आयुष्य बदललं'

अमिताभ बच्चन म्हणाले, 'मी काहीही विचार न करता बीएससीमध्ये प्रवेश घेतला. असं वाटलं होतं की, तिथे जाऊन काय अभ्यास करायचा आहे… बारावीला सायन्समध्ये चांगले मार्क मिळाले होते, त्यामुळे सायन्समध्ये भरपूर वाव आहे हे गेल्या १० वर्षांपासून ऐकत असल्याने हे करावं असं मला वाटलं. म्हणून मी बीएससीमध्ये प्रवेश घेतला. पण, प्रवेश घेतल्यानंतर ४५ मिनिटांनी माझं आयुष्य बदललं. 

बिग बी पुढे म्हणाले की, ‘जेव्हा मी पहिल्यांदा गेलो, तेव्हा ते अपयशी ठरलो... मग मी पुन्हा जाऊन कसंबसं उत्तर दिलं, तेव्हा मोठ्या कष्टाने मला ४२ टक्के गुण मिळाले. थोडक्यात वाचलो मी…’ अमिताभ बच्चन यांनी १९६२ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या किरोड़ीमल कॉलेजमधून पदवी घेतली होती.   अमिताभ बच्चन यांच्या फिल्मी करिअरला ग्रॅज्युएशननंतर सात वर्षांनी सुरुवात झाली. १९६९ मध्ये त्यांचा पहिला चित्रपट 'भुवन शोम' प्रदर्शित झाला. त्यानंतर लगेचच ते ‘सात हिंदुस्तानी’ मध्ये दिसले आणि अमिताभ हिंदी चित्रपटसृष्टीचे सुपरहिरो बनले. 

अमिताभ बच्चन लवकरच सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत 'वेट्टियन' या चित्रपटात झळकणार आहेत. वयाच्या या टप्प्यावर देखील सुपरफिट असणारे अमिताभ बच्चन चित्रपट आणि टीव्ही विश्वात प्रचंड सक्रिय आहेत.

Whats_app_banner