KBC 16: मला बाबांना परत आणायचंय! छोट्याशा युवराजची निरागस इच्छा ऐकून अमिताभ बच्चन देखील झाले भावूक
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC 16: मला बाबांना परत आणायचंय! छोट्याशा युवराजची निरागस इच्छा ऐकून अमिताभ बच्चन देखील झाले भावूक

KBC 16: मला बाबांना परत आणायचंय! छोट्याशा युवराजची निरागस इच्छा ऐकून अमिताभ बच्चन देखील झाले भावूक

Nov 06, 2024 03:52 PM IST

Kaun Banega Crorepati 16 Latest Update :युवराज सेठी हा ११ वर्षांचा विद्यार्थी असून तो इयत्ता सहावीत शिकतो. त्याने हा खेळ अतिशय दमदारपणे खेळला.

KBC 16 Amitabh Bachchan
KBC 16 Amitabh Bachchan

Kaun Banega Crorepati 16 Latest Update : सध्या कौन बनेगा करोडपती १६’मध्ये ज्युनिअर स्पर्धक खेळ खेळताना दिसत आहेत. हॉट सीटवर बसून लहान मुले त्यांचे अद्भुत ज्ञान दाखवत आहेत. 'केबीसी १६ ज्युनिअर' ४ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे ज्यामध्ये दिल्लीच्या युवराज सेठीने आपल्या दमदार खेळाने आपल्या पालकांची मान गर्वाने उंच केली आहे. ५० लाखांच्या प्रश्नाचे उत्तर चुकले, तरी २५ लाख जिंकून तो घरी परतला आहे. ५० लाखांसाठी त्याला विचारण्यात आलेला प्रश्न तसा कठीणच होता. या खेळा दरम्यान अमिताभ बच्चन यांच्याशी गप्पा मारताना चिमुकल्या युवराजने आपल्या दिवंगत वडिलांना पुन्हा जिवंत करण्याची मनीषा बोलून दाखवली.

कोणत्या प्रश्नावर अडकली युवराजची गाडी?

युवराज सेठी हा ११ वर्षांचा विद्यार्थी असून तो इयत्ता सहावीत शिकतो. त्याने हा खेळ अतिशय दमदारपणे खेळला. मात्र, एका प्रश्नाचे उत्तर चुकवल्याने तो ५० लाख जिंकू शकला नाही. तुम्ही पण हा प्रश्न बघा आणि याचं योग्य उत्तर येत असेल तर सांगा.

प्रश्न: या देशाचा एक पंचमांश भाग व्यापणाऱ्या सरोवरावरून यापैकी कोणत्या देशाचे नाव पडले?

पर्याय:

ए. मलावी

बी. चाड

सी. टांझानिया

डी. निकाराग्वा

या प्रश्नाचं उत्तर खरोखरच अवघड असलं तरी, युवराजने योग्य निर्णय घेतला आणि शो सोडला आणि २५ लाख रुपये जिंकून घरी गेला. हा खेळ सोडल्यानंतर जेव्हा त्याला योग्य उत्तराचा अंदाज लावण्यास सांगितले, तेव्हा त्याने सी. टांझानिया हा पर्याय निवडला, जो चुकीचा होता. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. मलावी.

KBC 16 : अवघ्या ११ वर्षांचा अर्जुन लखपती बनला; बिस्कीटाशी संबंधित प्रश्नावर अडकला! तुम्हाला माहितीय का उत्तर?

युवराजची ‘एमएनएम’ शक्ती काय? 

यावेळी ‘केबीसी १६ ज्युनिअर’मध्ये एक नवीन गेम आला आहे, ज्याचे नाव ‘भेजा स्कॅन’ आहे. यामध्ये हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाचा मेंदू स्कॅन केला जातो आणि त्यातून एक फाईल बाहेर येते आणि अमिताभ बच्चन ती वाचतात. अर्थात हा गंमतीशीर खेळ आहे. यावेळी युवराजचा मेंदूही स्कॅन केला गेला आणि त्यात एक फोल्डर सापडले ज्याचे नाव 'एमएनएम' होते. या फोल्डरबद्दल सांगताना युवराज म्हणाला, एम म्हणजे त्याची आई, एन म्हणजे त्याची आजी आणि एम म्हणजे काकू. या तिघी त्याच्या शक्ती आणि लाईफलाईन आहेत. 

दिवंगत बाबांना परत आणण्याची इच्छा!

‘केबीसी १६’मध्ये स्पर्धक म्हणून आलेल्या अवघ्या ११ वर्षांच्या युवराजने सांगितले की, आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर आपण आईचा आधार व्हावा, अशी त्याची इच्छा आहे. इतकंच नाही तर, आपल्याकडे अशी एखादी शक्ती असती, तर मी माझ्या बाबांना परत आणलं असतं, अशी इच्छा त्याने बोलून दाखवली. त्याचं हे बोलणं ऐकून अमिताभ बच्चन देखील भावूक झाले. वडिलांचा मृत्यू झाला असला तरी, युवराज खचून न जाता सगळ्या गोष्टी खूप सकारात्मकतेने घेतो.

Whats_app_banner