KBC 16: ‘केबीसी’च्या प्रत्येक नवीन सीझनसोबत वाढली अमिताभ बच्चन यांची फी! कोणत्या वर्षी मिळालं किती मानधन?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC 16: ‘केबीसी’च्या प्रत्येक नवीन सीझनसोबत वाढली अमिताभ बच्चन यांची फी! कोणत्या वर्षी मिळालं किती मानधन?

KBC 16: ‘केबीसी’च्या प्रत्येक नवीन सीझनसोबत वाढली अमिताभ बच्चन यांची फी! कोणत्या वर्षी मिळालं किती मानधन?

Published Aug 14, 2024 08:47 AM IST

KBC 16 Amitabh Bachchan Fees: केबीसीच्या पहिल्या सीझनसाठी अमिताभ बच्चन किती फी घेत होते आणि आता सीझन १६साठी किती फी आकारतात, ते जाणून घेऊया...

‘केबीसी’च्या प्रत्येक नवीन सीझनसोबत वाढली अमिताभ बच्चन यांची फी!
‘केबीसी’च्या प्रत्येक नवीन सीझनसोबत वाढली अमिताभ बच्चन यांची फी!

KBC 16 Amitabh Bachchan Fees: सगळेच प्रेक्षक अमिताभ बच्चन यांचा बहुप्रतीक्षित शो 'कौन बनेगा करोडपती'च्या पर्वाची म्हणजेच ‘केबीसी सीझन १६’ची आतुरतेने वाट पाहत होते. आता ती प्रतीक्षा संपली असून, १२ ऑगस्टपासून सोनी लिव्हवर हा शो सुरू झाला आहे. अमिताभ बच्चन या शोचे होस्ट आहेत. नेहमीप्रमाणेच त्यांची हटके आणि डॅशिंग स्टाईल लोकांना नेहमीच वेड लावते. या शोची खास गोष्ट म्हणजे संपूर्ण १६ सीझन्समध्ये केवळ एकच सीझन असा होता, जो बिग बींनी होस्ट केला नव्हता. ‘कौन बनेगा करोडपती सीझन ३’ शाहरुख खानने होस्ट केला होता. या शोसाठी अमिताभ बच्चन यांच्या फीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फार बदल झाला आहे. पहिल्या सीझनसाठी अमिताभ बच्चन किती फी घेत होते आणि आता सीझन १६साठी किती फी आकारतात, ते जाणून घेऊया...

'कौन बनेगा करोडपती' सीझन १ ते ५साठी अमिताभ बच्चन यांची फी

अमिताभ बच्चन यांचा शो 'कौन बनेगा करोडपती' सीझन १ साल २०००-२००१मध्ये आला होता. अमिताभ बच्चन यांनी तेव्हा या शोसाठी २५ लाख रुपये घेतले होते. ‘बिग बीं’नी सीझन २ आणि ४साठी तब्बल ५० लाख रुपये घेतले होते. परंतु, याबाबत फारशी अधिकृत माहिती उपलब्ध नाही. यात केबीसी ३चा उल्लेख करता येत नाही. कारण हा सीझन अमिताभ बच्चन यांनी नाही, तर शाहरुख खानने दिग्दर्शित केला होता. यानंतर ‘कौन बनेगा करोडपती’च्या पाचव्या सीझनसाठी अमिताभ बच्चन यांनी जवळपास ७५ लाख रुपये फी घेतली होती. या हंगामातील फीबाबतही कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही.

६ ते १० सीझनसाठी ‘बिग बीं’नी किती शुल्क आकारले?

अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ची क्रेझ लोकांमध्ये खूपच वाढत आहे. या शोच्या सीझन ६ ते सीझन १०च्या फीबद्दल बोलायचे तर, या शोच्या सीझन ६ आणि ७साठी बिग बींनी १.५ कोटी ते २ कोटी रुपये घेतले होते. तर, ८व्या सीझनमध्ये त्यांना २ कोटी आणि ९व्या सीझनमध्ये २.६ कोटी रुपये मिळाले. या अभिनेत्याला १०व्या सीझनसाठी ३ कोटी रुपये मिळाले होते.

११ ते १६व्या सीझनची फी किती?

केबीसीच्या ११व्या सीझनपासून ते १३व्या सीझनपर्यंत अमिताभ बच्चन यांना ३.५ कोटी रुपये फी मिळाली आहे. तर, १४व्या हंगामासाठी ४ ते ५ कोटी रुपये मिळाले. मात्र, १५व्या सीझनसाठी अमिताभ यांना किती फी मिळाली याचे आकडे समोर आले नव्हते. तर, १६व्या सीझनसाठी अमिताभ यांनी किती फी घेतली याची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांना ‘कौन बनेगा करोडपती सीझन १६’साठी तब्बल ५ कोटी रुपये फी मिळाली आहे.

Whats_app_banner