बुद्धीमत्तेच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी ही छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात दिली जाते. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमाचा १६वा सिझन सुरु झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये २२ वर्षीय मुलाने ५० लाख रुपये जिंकल्याचे समोर आले होते. आता त्याला १ कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्नाचे त्याने योग्य उत्तर दिले की नाही असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
केबीसी १६च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये उज्वल प्रजापती नावाचा कंटेस्टंट हॉट सीटवर बसला होता. त्याने बुद्धीमत्तेच्या जोरावर १ कोटी रुपयांच्या प्रश्नाची योग्य उत्तरे दिले. पण जेव्हा बिग बींनी १ कोटी रुपयांचा प्रश्न विचारला तेव्हा हूटर वाजला आणि एपिसोड संपला. आता उज्वल १ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उज्वल हा अतिशय गरीब कुटुंबातून आला आहे. त्याचे वडील हे मजुरी करतात. तसेच त्यांना दारुचे व्यसन लागले आहे. त्याची आई बिडी बनवण्याचा व्यवसाय करते. ती दिवसाला केवळ ५० ते ६० रुपये कमावते. तसेच त्याची आजी मातीपासून मडकी बनवून विकते. उज्जवल प्रजापतीने सांगितले की घर चालवण्यासाठी तो स्वतःही खूप मेहनत करतो. अमिताभ बच्चनने जेव्हा त्याला विचारले की जिंकलेल्या पैशाचे काय करणार तेव्हा त्याने सांगितले की बहिणीचे लग्न लावून देईन आणि डोक्यावर असलेले कर्ज फेडून टाकेल. स्वत:साठी एखादी गाडी घेणार आणि आजी-आईला करत असलेले काम बंद करायला सांगेन.
अमिताभ बच्चन उज्वलचे ऐकून भावूक झाले. ‘केबीसी १६’च्या आजच्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन त्याला एक करोड रुपयांचा प्रश्न विचारताना दिसतील. याचा प्रोमोही आलेला आहे. यामध्ये उज्वल येथेपर्यंत पोहोचल्याचा आनंद व्यक्त करतो. तो व्हिडीओ कॉलद्वारे आई आणि बहिणीशी बोलतो. अमिताभ त्यांच्या आई आणि बहिणीस सांगतात की तो ५० लाख रुपये जिंकला आहे.
वाचा: अशी मी मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी; 'फुलवंती'मधील पहिल्या गाण्याने लावले प्रेक्षकांना वेड
आजच्या भागाच्या प्रोमो व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन उज्वलला १ कोटी रुपयांसाठी १५वा प्रश्न विचारताना दिसत आहेत. स्क्रीनवर प्रश्न पाहून उज्जवल म्हणतो की त्याने हा प्रश्न वाचलेला आहे. पण या प्रश्नाचे योग्य उत्तर त्याला माहिती नसते. मग तो एक मोटिवेशनल कोट सांगतो. आता उज्वल १ कोटी रुपये जिंकला की नाही हे आगामी भागात स्पष्ट होणार आहे.