अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेल्या रिअॅलिटी क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती'चा पाचवा एपिसोड खूपच मनोरंजक आहे. या शोची सुरुवात सिमरन बजाजने केली होती, जी मागील सीझनची रोल ओव्हर स्पर्धक होती. मागील एपिसोडमध्ये सिमरनने अनेक अवघड प्रश्नांची अचूक उत्तरे दिली होती आणि या सीझनमध्येही तिने सुरुवातीलाच सुपर फास्टेस्ट फिंगर फस्ट प्रश्नाचे उत्तर देत हॉटसीटवर बसण्याचा मान मिळवला. पण तिने ३ लाख २० हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले नाही. ते तुम्ही देऊ शकाल का?
कौन बनेगा करोडपती १६ मध्ये सिमरनला ३ लाख २० हजार रुपयांसाठी प्रश्न विचारण्यात आला होता. कोलंबियामध्ये २०११ मध्ये कोणाच्या उत्पादन केंद्रांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला होता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी A. व्हीट, B. कॉफी, C. चहा, D. साखर असे पर्याय देण्यात आले होते. सिमरनलाही या प्रश्नाचं उत्तर माहित होतं, पण तिला खात्री देता आली नाही. या प्रश्नाचे अचूक उत्तर होते B. कॉफी. गोंधळलेल्या अवस्थेत तिने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.
१ लाख ६० हजार रुपये जिंकणाऱ्या सिमरनला निघण्यापूर्वी योग्य उत्तराचा अंदाज घेण्यास सांगण्यात आले, तिने पर्याय बी निवडला जो योग्य उत्तर होता. रिस्क न घेण्याऐवजी सिमरनने कमी रक्कम घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, तोही योग्यच होता. निघण्यापूर्वी सिमरन म्हणाली की, 'आज मी एक खूप मोठा धडा शिकले आहे की स्वत:वर विश्वास असणे खूप महत्वाचे आहे.' या विश्वासाच्या कमतरतेमुळेच तिने ३ लाख २० हजार रुपये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
वाचा : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकारांना बक्षिस म्हणून किती रक्कम मिळते माहिती आहे का?
कौन बनेगा करोडपतीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये सिमरन वेडिंग ड्रेस घालून पोहोचली होती. या स्टाईलमध्ये ती हॉटसीटवर येण्यामागचे कारणही इंटरेस्टिंग होते. सिमरनने सांगितले की, तिला लग्न करायचे नव्हते, पण तरीही त्यांनी लग्न केले. तिने सांगितले की, जेव्हा तिने लग्न केले तेव्हा तिच्या आयुष्यात अनेक नव्या संधी येऊ लागल्या. सिमरनने आपल्या पतीला भाग्यवान म्हटले आणि सांगितले की या वर्षी मे महिन्यात त्यांचे लग्न झाले आहे. आता पुढच्या भागात काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.